Post Views: 6
सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल खटावचा सोहम इगावेचे यश
खटाव – गौरीशंकर ज्ञानपीठ संचालित सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल खटाव येथील विद्यार्थी सोहम विशाल इगावे याने नवोदय विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत उज्वल यश संपादन केले त्याने प्राप्त केलेल्या यशाबद्दल स्कूलच्या वतीने प्राचार्या प्रमिला टकले यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सोहम इगावे ने प्राप्त केलेले यशाबद्दल अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप ,संचालक डॉ अनिरुध्द जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितिन
मुङलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन केले.