Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सुनिता विल्यम्स यांच्या आगमना पित्यर्थ पेढ्याचे वाटप

सुनिता विल्यम्स यांच्या आगमना पित्यर्थ पेढ्याचे वाटप

सुनिता विल्यम्स यांच्या आगमना पित्यर्थ पेढ्याचे वाटप

वाई प्रतिनिधी(शुभम कोदे )कर्मवीर भाऊराव पाटील विदयलाय भुईज व महात्मा गांधी विद्यालय पाचवड ता. वाई येथे पृथ्वी कन्या सुनीता विल्यम्स अंतराळातील तब्बल नऊ महिन्यांचा वास्तव यानंतर पृथ्वीवर सुखरूप परतल्या या आनंद पित्यर्थ निकमवाडी ता. वाई येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक जयवंत निकम यांच्या संकल्पनेतून आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी लाईफ मेंबर प्रकाश गायकवाड यांच्या माध्यमातून दोन्ही विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांना साताराचे सुप्रसिद्ध कंदी पेढ्याचे वाटप करून हा आनंद द्विगणित करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव प्रभारी प्राचार्य एस आर पतंगे प्रसाद वालेकर गुरुकुल प्रमुख एम बी भोईटे मुख्याध्यापक मुल्ला आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक गणेश गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते पेढ्याचे बॉक्स विद्यालयांना देण्यात आले विद्यार्थ्यांना अंतराळातील जीवनक्रम दैनंदिन दिनचर्या याविषयी माहिती स्वाती देसाई व अमोल गोसावी यांनी मुलांना सांगितली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket