दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित दिवाळी पहाट निमित्त सुजाता दरेकर प्रस्तुत “स्वरागिनी” गीत मैफिल कार्यक्रम गुरुवारी
सातारा : 27 (प्रतिनिधी) दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या,. सातारा या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही शाहूनगर वासियांना व समस्त सातारकर रसिक श्रोत्यांसाठी दिवाळी सणाच्या मंगल प्रसंगाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने शाहूपुरी शाखेच्या प्रांगणात ” शाहूपुरी चौक” सातारा येथे दिवाळी पहाट निमित्त “सुजाता दरेकर” प्रस्तुत ” स्वरागिनी ” या हिंदी व मराठी गीतांचा श्रवणीय कार्यक्रम गुरुवार दि. 31ऑक्टोबर 2024 रोजी नरक चतुर्थी दिवशी पहाटे 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ” सोनसळी किरणांनी वसुंधरा उजळली लखलखती दिवाळी सुरमयी झाली तेजाचे लक्ष दिवे झुलती कंदीलात रंगांची चित्र फुले सजती रांगोळीत यश अन कीर्तीसंह समृद्धी येऊ दे मोल नक्षत्रांचे नात्यांना लाभू दे”
या शिल्पा चिटणीस यांच्या सुंदर चारोळीने संस्थेचे संस्थापक-चेअरमन शिरीष चिटणीस यांनी दीपावली निमित्त संस्थेच्या सर्व सभासद,खातेदार व हितचिंतकांना मंगलमय शुभेच्छा दिल्या.
” स्वरागिनी ” या सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा श्रवणीय ,सुमधुर “दिवाळी पहाट” कार्यक्रमात सुजाता दरेकर, सुधीर मुळे ,जितेंद्र पवार, गीता पाटील, श्वेता जाधव आपली सुमधुर गीते रसिक श्रोत्यांसाठी सादर करणार असून तबला व ढोलकी ची साथ शुभम दाखले देणार आहेत . सिंथेसायझर प्रवीण जाधव,ऑक्टोपॅड ला अमोल वाघ यांची साथ लाभली असून कार्यक्रमाचे निवेदन वर संजय क्षीरसागरकरणार आहेत . या कार्यक्रमाचे संयोजन सुजाता दरेकर यांचे असून कुलदीप पवार यांची ध्वनी व्यवस्था लाभली आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व असलेल्या सर्व सणापैकी सणांचा शिरोमणी असलेला दिवाळीचा सण सुरू झाला असून या दिवाळी सणाचा समस्त सातारकर रसिक श्रोत्यांचा आनंद द्विगुणित करण्याकरिता दीपलक्ष्मी पतसंस्थेने सन 2007 पासूनच शाहूपुरीवासीयांसाठी व समस्त सातारकर रसिक श्रोत्यांसाठी गेली 18 वर्ष अविरत सुमधुर गीतांची सदाबहार पर्वणी देण्याचा उपक्रम सातत्याने राबवित आहे. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक -चेअरमन, शिरीष चिटणीस, व्यवस्थापक विनायक भोसले, शाखाधिकारी व सह.व्यवस्थापक रवींद्र कळसकर, तसेच संस्थेचे संचालक भगवान नारकर, लालासो बागवान, आप्पासो शालगर, अनिल चिटणीस, प्रदीप देशपांडे, शिवाजी हंबीरे,जगदीश खंडागळे,सौ. शिल्पा चिटणीस, सुनील बल्लाळ, हणमंत खुडे उपस्थित राहणार आहेत.
तरी दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित “स्वरागिनी” या गीत मैफिलीस समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे व आपला दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले तसेच “स्वरागिनी” ग्रुपच्या प्रमुख सुजाता दरेकर यांनी केले आहे.
