वाई शेती उत्पन्न बाजार समिती नवीन हळद आवक सुरू उंच्चाकी दर रू.१६१००/- वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी महाराष्ट्र राज्याचे लाङके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मैत्रीला 23 वर्षानंतर उजाळा ९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » न्यू इंग्लिश स्कूल सातारा च्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास

न्यू इंग्लिश स्कूल सातारा च्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास

न्यू इंग्लिश स्कूल सातारा च्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास

125 किलोमीटर ची ‘शतकोत्तर रौप्य महोत्सव दौड RUN125’ रिले पद्धतीने यशस्वीरीत्या पूर्ण. 150 विद्यार्थ्यांचा सहभाग 125 ऐतिहासिक स्थळांचे स्मरण

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन सुमारे दीडशे वर्ष कार्यरत असलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे, ही भारतातील एक अत्यंत नामवंत शिक्षण संस्था..! याच संस्थेची सातारा येथे न्यू इंग्लिश स्कूल ही 06, डिसेंबर 1899 साली स्थापन झालेली मराठी माध्यमाची शाळा, आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची 125 वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने शाळेने वर्षभर विविध शैक्षणिक, सामाजिक तसेच विद्यार्थ्यांना स्फूर्तीदायक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे च्या न्यू इंग्लिश स्कूल सातारा शतकोत्तर रौप्य महोत्सव पुर्तीनिमित्त अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी शालेय व्यवस्थापनाद्वारे 125 किलोमीटर रिले पद्धतीची दौड, राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून आयोजित केली होती. या दौडचे वैशिष्ट्य म्हणजे 125 वर्षपूर्ती निमित्त 125+ विद्यार्थी, 125 किलोमीटरचे अंतर, 125 ऐतिहासिक स्थळांचे स्मरण करत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांना स्पर्श करून, यशस्वीरित्या पूर्ण केली.

या ऐतिहासिक दौडचे उद्घाटन शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजता कुंदनमल फिरोदिया सभागृह, फर्ग्युसन आवार येथे नियमक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. आबा रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोकराव पलांडे, कार्यवाह आनंद काटिकर, तसेच सर्व नियामक मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत जर्सी चे अनावरण करून व रिले चे बॅटन हस्तांतरित करून, मान्यवर व सहभागी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी विश्वस्त अनंत जोशी, सारंग कोल्हापुरे, नितीन पोरे, खेमराज रणपिसे, डॉ. शरद आगरखेडकर, मिलिंद कांबळे व मान्यवर उपस्थित होते.

रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून पहाटे 4:00 वाजता या दौडची सुरुवात उत्साहात झाली. पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, छत्रपती शिवरायांच्या निवासाने पुनित झालेला लाल महाल, शनिवार वाडा, श्री गोळवलकर गुरुजी स्तंभ, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापकांपैकी लोकमान्य टिळक यांचा निवास असलेला केसरी वाडा अशा अनेक स्थळांपाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे च्या स्वयंसेवकांद्वारे रांगोळ्या घालून, फटाक्यांची आतषबाजी करून, तसेच सनई चौघड्यांच्या मंगल सुरांच्या साक्षीने फुलांची उधळण करत दौडचे भव्य स्वागत करण्यात आले. दौड सुलभ व्हावी यासाठी निवृत्त मुख्याध्यापक श्री सुनील शिवले व पुणे येथील संस्थेच्या शाळांचे क्रीडा शिक्षक, श्रीकांत विंचू, स्वप्निल देशमुख, महेश जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

नरवीर तानाजी मालुसरे तथा सिंहगड रोड वरून वीर बाजी पासलकर चौकात ही दौड आली व महामार्गावरील सेवा रस्त्याने साताऱ्याकडे कुच केली. या संपूर्ण 125 किलोमीटर मार्गाचे 43 टप्पे करण्यात आले होते व प्रत्येक टप्पा हा सुमारे तीन किलोमीटरचा करण्यात आलेला होता. या प्रत्येक टप्प्यात तीन विद्यार्थ्यांनी संस्थेचे मानचिन्ह घेऊन दौड केली व आपल्या पुढच्या सहकाऱ्यांकडे ते मानचिन्ह हस्तांतरित करत 125 किलोमीटरचे अंतर पूर्ण अत्यंत जबाबदारीने पूर्ण केले. यादरम्यान अत्यंत रोमांचकारी व आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जात ही दौड विविध नैसर्गिक परिस्थितीला तोंड देत महामार्ग बोगदा, सेवा रस्ता, खंबाटकी घाट अशा विविध अनुभव घेत विद्यार्थी यशस्वीरित्या दौड करत सायंकाळी चार वाजता ‘शिवतीर्थ’, पोवई नाका सातारा येथे पोहोचेली. 

दौड च्या यशस्वीतेसाठी मा. खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मा. ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मा. ना. चंद्रकांतदादा पाटील, मा. संतोषजी पाटील जिल्हाधिकारी सातारा जिल्हा, मा. समीरजी शेख पोलीस अधीक्षक सातारा जिल्हा, मा. युवराजजी करपे जिल्हाशल्यचिकित्सक सातारा जिल्हा, तसेच महामार्गावरील कार्यक्षेत्र असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे भरीव सहकार्य लाभले.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी, मा. पोलीस अधीक्षक पुणे शहर जिल्हा, मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण जिल्हा, मा. जिल्हाशल्यचिकित्सक पुणे, महामार्ग प्राधिकरण आदी अनेक आस्थापनांची मान्यता घेण्यात आलेली होती. या संपूर्ण मार्गावर रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आलेली होती तर सर्व विद्यार्थ्यांचा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी द्वारा विमा देखील उतरवण्यात आला होता.

विद्यार्थ्यांना संस्थेच्या शैक्षणिक योगदानाचे महत्त्व कळावे, शारीरिक बलसंपदा वृद्धिंगत होण्यासाठी आव्हानात्मक उपक्रम घेऊन शारीरिक व मानसिक ताकदीत वाढ व्हावी तसेच ऐतिहासिक ठिकाणांचे स्मरण करून देशभक्तीचा संस्कार व्हावा अशी या उपक्रमा मागची संकल्पना होती व ती यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका, श्रीमती सुजाता पाटील, उपमुख्याध्यापक श्री भोसले, पर्यावेक्षक सौ गायकवाड, सौ कदम, श्री नाईक, श्री सातपुते, क्रीडाशिक्षक अमोल कदम, कैलास बागल ,अमित मोरबाळे ,विनायक काकडे ,ऋतुराज घाडगे, योगेश जाधव, सीमा जोशी, माधुरी चाफेकर, अपर्णा जाधव, पुनम मोरे, रूपाली हराळे, सुवर्णा देशपांडे, मनीषा सुपे, गीता जगताप, संदीप काळे, संदीप माळी, सुधाकर गुरव, दीपक मजलेकर, तुषार कुलकर्णी, श्रीकृष्ण कुलकर्णी, चंद्रशेखर पानस्कर, बालाजी चव्हाण, मस्कु मोरे, निलेश रामूगडे, संतोष माने, सचिन राजोपाध्ये, सोपान सपकाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले. दौडच्या यशस्वीतेसाठी डॉ. किरण मजलेकर यांनी तांत्रिक सहाय्य केले.

महामार्गावर सुरूर येथे वाई येथील सोसायटीच्या द्रविड हायस्कूल व रमेश गरवारे स्कूल चे शिक्षक व विद्यार्थी स्वागत साठी उपस्थित होते. शिवतीर्थ ते न्यू इंग्लिश स्कूल या मार्गावर संस्थेच्या नवीन मराठी शाळा, बालक मंदिर व दातार शेंदूरे इंग्लिश मीडियम स्कूल या घटक संस्थांचे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासह बहुसंख्य सातारकर प्रोत्साहन देण्यासाठी उत्साहाने उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले व पदक वितरण समारंभ दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ महाडिक यांनी केले तर श्रीनिवास कल्याणकर यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

Live Cricket