सोनम हनिमुनसाठी गेली अन् नवऱ्याला संपवलं, काय आहे संपूर्ण प्रकरण?
मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये राजा रघुवंशी आणि सोनम नावाच्या तरूणीचं लग्न 11 मे रोजी झालं होतं. ते 20 मे रोजी हनिमुनसाठी गेले. शिलॉंगजवळील मावलाखियात गावात होमस्टे करून राहिले. 23 रोजी सकाळी त्यांनी चेकआऊटकेलं. पण 24 मे रोजी सोहरीम जवळ त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर बेवारस अवस्थेत आढळली. पण 2 मे रोजी जे घडलं, ते अत्यंत भयानक होतं. वायसाडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह आढळला. हातावरील टॅटूने त्याची ओळख पटली.
मेघालय पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली. परंतु सोनम अजूनही बेपत्ताच होती. राजाचं कुटूंब सीबीआय चौकशीची मागणी करत होतं. स्कूटी जिथे सापडली होती, त्याच्यापासून 25 किलोमीटर अंतरावर राजाचा मृतदेह आढळला. राजाचं अपहरण करून हत्या करण्यात आली. सोनमचंही अपहरण झालं असावं, अशी शंका व्यक्त केली जात होती.
राजाची सोन्याची साखळी, हिऱ्याची अंगठी, ब्रेसलेट आणि पाकिट गायब होतं. त्यामुळे चोरीसाठी त्याची हत्या करण्यात आल्याचं संशय सगळीकडून व्यक्त केला जात होता. इंदौरमध्ये राजावर अंत्यसंस्कार पार पडले. सोनमला शोधण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ यांच्या मदतीने शोध मोहिम सुरू आहे. तर राजाचा मोबाईल अन् हत्येत वापरलेलं शस्त्र पोलिसांनी जप्त केला होता. पण या बहुचर्चित प्रकरणात जे सत्य बाहेर आले, त्याने सर्वांनाच धक्का बसलाय. सोनम रघुवंशीला गाझीपूर येथून अटक करण्यात आलीय. तिच्यासोबत आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
