स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांना कलाविष्काराची ऊर्जा मिळते – प्राचार्या विभा साबळे
सनशाईन स्कूल खटाव चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
खटाव – स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी तर मिळतेच परंतु या कलाविष्काराच्या उर्जेतून उज्वल करिअर ही घडते असे मत कोटेश्वर महाविद्यालय व जुनिअर कॉलेज लिंबगोवेच्या प्राचार्या विभा साबळे यांनी व्यक्त केले त्या ता, खटाव जि. सातारा येथील गौरीशंकरच्या सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन 2025 च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ.अनिरुद्ध जगताप ,जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर ,प्राचार्या प्रमिला टकले ,पालक प्रतिनिधी डॉ. प्रिया शिंदे, जय हिंद फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता फडतरे. डॉ.मनाली शहा अदि प्रमुख उपस्थित होते.
भव्य दिव्य उभारलेल्या रंगमंचावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सांस्कृतिक उपक्रमातून कलाविष्काराचे सादरीकरण केले प्रारंभी विविध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस हे देऊन गौरविण्यात आले विद्यार्थ्यांनी सादर केलेली कोळी नृत्य, रामायण ,लघुनाटिका ,बावधनचे बगाड ,आदिवासी नृत्य, सोलो डान्स ,कॉकटेल डान्स, महाराष्ट्राची लोककला, राजस्थानी नृत्य, देशभक्तीपर नृत्याचे सादरीकरण केले.
वार्षिक स्नेहसंमेलनास पुरोगामी संस्थेचे सचिव नेताजी माने व गौरीशंकरचे अध्यक्ष मदनराव जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ घाडगे, पुनम साळुंखे यांनी केले कार्यालय अधीक्षक वैभव जठार यांनी आभार मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
