सकारात्मकतेच्या उर्जात जीवन उत्कर्षाचे खरे सामर्थ्य- श्रीरंग काटेकर
गौरीशंकर एम फार्मसी लिंबच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, राष्ट्रीय स्तरावर नवसंशोधन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनी प्रियांका गव्हाणे हिचा उचित सत्कार
लिंब- जीवनात उत्तुंग ध्येयप्राप्तीसाठी मनामध्ये सकारात्मकतेची ऊर्जा असली तरच अशक्य ते शक्य करता येते याची प्रचिती दैनंदिन जीवनात अनुभवायला मिळते या शक्तीमध्येच खऱ्या अर्थाने जीवन उत्कर्षाचे खरे सामर्थ्य सामविले आहे असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या एम फार्मसी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या नवसंशोधन प्रोजेक्ट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रियांका गव्हाणे हिच्या सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.योगेश गुरव ,डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ.भूषण पवार, एम फार्मसी विभाग प्रमुख डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. किर्ती माने, प्रबंधक निलेश पाटील अदि प्रमुख उपस्थित होते.
जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी भविष्यातील उज्वल करिअर घडविताना मनाचे व शरीराचे निरोगी आरोग्य हे तितकेच महत्त्वाची आहे याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी.
प्राचार्य डॉ. योगेश गुरव म्हणाले की औषध निर्माण क्षेत्रातील घडणारे नाविन्यपूर्ण बदल पाहता विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील सखोल ज्ञान घेणे क्रमप्राप्त आहे एम फार्मसी च्या उच्च शिक्षणातून मिळालेले अनुभव व ज्ञानातून विद्यार्थ्यांनी नवसंशोधनाची कास धरावी.
यावेळी महाविद्यालय स्तरावर बेस्ट आऊट गोंईग स्टुडन्ट सन 2024 ची मानकरी ठरलेली प्रणिता रांजणे हिला प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन उचित सत्कार करण्यात आला
यावेळी एम फार्मसीच्या वार्षिक निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील जुन्या भावस्पर्श आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजश्री पोळ व आभार गीतांजली होले यांनी मानले
चौकट – राष्ट्रीय स्तरावरील नाविन्यपूर्ण संशोधन स्पर्धेत गौरीशंकर एम फार्मसी ची प्रियांका गव्हाणे चमकली….
मुंबई येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय स्तरावर औषध निर्माण शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक ज्ञान कौशल्ये व नाविन्यपूर्ण कल्पकता यावर आधारित नवसंशोधन स्पर्धेचे आयोजन क्रिएटिव्ह आयडियाज अँड इनोव्हेशन्स इन ॲक्शन(सी आय आय ए) या नामांकित संस्थेने केले होते देशभरातून आलेल्या असंख्य प्रोजेक्ट मधून केवळ वीस नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट निवड विविध निकषाच्या आधारे या संस्थेमार्फत करण्यात आले. यामध्ये गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील अंतिम वर्ष एम फार्मसी ची विद्यार्थिनी प्रियांका गव्हाणे हिने सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट (संशोधनाची) दखल घेऊन सी आय आय ए मुंबई या संस्थेने तिच्या प्रोजेक्टची निवड करून तिचा उचित सन्मान व सत्कार केला आहे तसेच पद्मभूषण प्रख्यात अनुवैज्ञानिक ङाँ.अनिल काकोङकर यांनी तिच्या संशोधनात्मक कार्याची प्रशंसा केली तिच्या यशस्वी कामगिरीचा महाविद्यालयास साथ अभिमान वाटतो. महाविद्यालयातर्फे तिला संशोधनातील उल्लेखनीय कामगिरी केल्याचे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
चौकट – पदमभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्याकडून प्रियांका गव्हाणेचे कौतुक…
डेव्हलपमेंट ऑफ सिल्व्हर नॅनोपर्टिकल इम्प्रिग्नेटेड किटोकोनॅझोल नॅनोक्रिस्टल्स लोडेड टॉपिकल हायड्रोजेल फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ अटिफंगल अँक्टिव्हिटी या विषयावर नविण्यपूर्ण संशोधन प्रियांका गव्हाणे हिने करून मानवी शरीरातील विविध ठिकाणी होणार्या त्वचेच्या आजारावर प्रभावी औषधनिर्मितीचे संशोधन केले आहे या संशोधनामुळे शरीरातील विविध अवयवामध्ये बुरशीजन्य रोगावर. प्रभावी औषध निर्मिती होणार आहे तसेच पावसाळ्यात होणार्या त्वचेच्या रोगांवर विशेषता गजकर्ण खरुज, नायटा, तसेच न बर्या होणार्या जखमा यावर हे औषध प्रभावी ठरणार आहे प्रियांका गव्हाणेच्या या नविन्यपूर्ण संशोधनामुळे त्वचेच्या दुर्धर आजारावर आता मात करणे सहज शक्य होणार आहे व तिच्या या कल्पक संशोधनासाठी गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंबचे एम फार्मसी चे विभाग प्रमुख डॉ धैर्यशील घाडगे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच या नविन्यपूर्ण संशोधनाची पदमभूषण प्रख्यात अनुवैज्ञानिक डॉ अनिल काकोडकर यांनी पाहणी करून तिच्या नाविन्यपूर्ण कल्पकतेवर आधारित संशोधनाची भरभरून कौतुक व प्रशंसा केली.