Home » राज्य » शेत शिवार » श्रीराम विकास सोसायटी माती परीक्षण करणार :- नितीनदादा भिलारे

श्रीराम विकास सोसायटी माती परीक्षण करणार :- नितीनदादा भिलारे 

श्रीराम विकास सोसायटी माती परीक्षण करणार :- नितीनदादा भिलारे 

श्रीराम विकास सोसायटी भिलार तर्फे भिलार व भिलार परिसरातील शेतीमध्ये जाऊन शेतातील माती परीक्षण करण्यात येणार आहे व या मातीमध्ये असणाऱ्या घटकांचा अभ्यास करून कोणत्या प्रकारची स्ट्रॉबेरी व इतर पीक लावले पाहिजे याबाबत श्रीराम विकास सोसायटी तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे

 सदर कार्यक्रमांमध्ये बोलताना सोसायटीचे चेअरमन मा. नितीन दादा भिलारे म्हणाले की महाबळेश्वर तालुक्यामध्ये दरडोई शेती क्षेत्र हे कमी असल्यामुळे अनेक शेतकरी पीक फेरपालट करणे अपेक्षित आहे असे असतानासुद्धा त्याच क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी पिक सातत्याने घेतले जाते ,त्यामुळे जमिनीचा पोत कमी होतो ,जमिनीचा कस कमी झाला कि उत्पनाची घट हि अपेक्षित असते,हि घट भरून काढण्यासाठी अवास्तव रासायनिक खतांचा वापर केला जात आहे .

शेतकऱ्यांना रासायनिक खात व औषधे घेण्यामध्ये ज्यादा रक्कम खर्च करावी लागत आहे त्यामुळे मिळणाऱ्या नफाही कमी होत आहे .गेली अनेक वर्ष कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विनंती करूनही माती परीक्षणा कडे शेतकरी दुर्लक्ष करीत आहे .

शेती महाबळेश्वरच्या विकासाचा आत्मा आहे हि शेती टिकवायची असेल तर माती परीक्षण करून योग्य प्रमाणात खतांचा वापर करणे गरजेचे आहे ,यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात घट होईलच व माती सुरक्षित राहू शकेल यासाठी संस्थेचे चेअरमन नितीन दादा भिलारे यांनी पुढाकार घेतला असून सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील प्रत्त्येक शेतकऱ्याच्या बांधावर पोर्टेबल माती परीक्षण संयंत्र नेण्यात येणार आले या मशीन मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर माती परीक्षण करून लगेच रिपोर्ट मिळणार आहेत .

या रिपोर्टमध्ये मातीमध्ये असणारे अनेक घटक जसे की नायट्रोजन ,फॉस्फरस, पोटॅशियम, मातीमध्ये असलेले पीएच या सर्व घटकांचा एक रिपोर्ट मिळतो व त्यानुसार शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे पिकाच्या स्वरूपात फायदा होऊ शकतो

शेती हि आधुनिकतेकडे गेलेली आहे व स्पर्धात्मक युगात तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांनी टेक्नोलॉजीचा वापर केल्यास महाबळेश्वर शेती क्षेत्रात चांगली प्रगती करेल त्यासाठी श्रीराम वि का स सेवा सोसायटी सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही नितीन दादा भिलारे यांनी दिली आहे .श्रीराम विकास सेवा सोसायटी हि शेतकऱ्यांची संस्था आहे हि जाणीव शेतकऱ्यांना व्हावी यासाठी संस्थेचे अध्यक्षपद भूषविताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी अद्यावत कार्यालयाची संकल्पना साकार केली आहे ज्यामध्ये चांगल्या बैठक व्यवस्थेबरोबच , सात बारा उतारा ,स्ट्रॉबेरी बॉक्स ,मल्चिंग पेपर अशा अनेक सुविधा एका छताखाली दिले जातात

सदर कार्यक्रमाला श्री नितीन दादा भिलारे ,राजेंद्र आबा भिलारे,शिवाजीराव दाभाडे ,गणपत शेठ पराठे , विश्वनाथ भिलारे.श्री अरविंद दानावले, .वसंत बाबुराव भिलारे , संतोष मोरे .सुनील भिलारे ,अशोक भिलारे , रोहन राजेंद्र भिलारे , बाजीराव भिलारे ,सुधीर भिलारे ,राज धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket