महाबळेश्वर :महाबळेश्वर मुक्कामी आलेले, राज्याचे राज्यपाल महामहिम श्री. रमेश बैस यांची महाबळेश्वर येथील राजभवन येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांनी राज्याच्या विकासाच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. महामहिम राज्यपाल मा. रमेश बैस यांना निवेदन देताना राज्याच्या विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली.
यामध्ये क्षेत्र महाबळेश्वर मध्ये उगम पावून सातारा सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश येथे बंगालच्या सागराला मिळणाऱ्या कृष्णा नदीचे सुशोभिकरण आणि शुध्दीकरण करण्यासाठी नमामी गंगा योजनेच्या धर्तीवर नमामी कृष्णा योजना महाराष्ट्र आणि अन्य राज्यात राबविणे.
बौध्द सर्किट किंवा रामायण सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किट योजना मार्गी लावणे, या शिवस्वराज्य सर्किट योजनेमधुन, छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास अधिकाधिक वृध्दींगत करण्याकरीता तसेच मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा जपण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याच्या, राजगड, रायगड आणि सातारा या तीन राजधान्यांचा सुचीबध्द आणि समयबध्द विकास करणे, तसेच पानीपत ते तंजावर मधील ऐतिहासिक स्थळांचा आणि परिसराचा सुयोग्य विकास साधणे, जेणेकरुन मराठा साम्राज्याच्या समृध्द इतिहास परंपरेचे
अवलोकनासाठी जगभरातून इतिहासप्रेमी याठिकाणी भेट देतील आणि पर्यटनाला देखिल अधिक चालना मिळेल.
महाबळेश्वर जवळील प्रतापगड सह राज्यातील गडकिल्यांचे संवर्धन करण्यासाठी योजना आखणे, महाबळेश्वर-पाचगणीच्या विकासाकरीता स्थापित करण्यात आलेल्या उच्यस्तरीय संनियंत्रण समितीवर, संसद-विधीमंडळ प्रतिनिधींसह, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणीच्या नगराध्यक्षांची नियुक्ती करणे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचा अधिकृत इतिहास भारत सरकारद्वारे प्रसिध्द करणेकरीता राज्याने पावले टाकणे या प्रमुख विषयांसह अन्य काही विषयांवर राज्यपाल महामहीम रमेश बैस यांचेशी चर्चा केली.
राज्यपाल महोदय यांनी अत्यंत आस्थवायीकपणे सविस्तर मांडलेल्या मुद्दे समजून घेताना, याविषयी राज्यशासनाचे प्रशासन निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही करेल असे नमुद केले.या चर्चेच्या वेळी जितेंद्र खानविलकर, गणेश भोसले, अॅडव्होकेट विनित पाटील, प्रितम कळसकर व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.