धक्कादायक | संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज यांची आत्महत्या
महाराष्ट्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संत तुकारामांचे ११ वे वंशज, प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले यामुळे देहू गावावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला.
शिरीष महाराज यांचे काही दिवसांपुर्वी लग्न ठरले होते, साखरपुडा देखील झाला होता. 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होता, मात्र त्यांनी आधीच असं टोकाचं पाऊल उचलल्याने त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
माहितीनुसार सकाळी राहत्या घरी शिरीष महाराज मोरे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. आज संध्याकाळी 4 वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
