Home » राज्य » महाबळेश्वर नगराध्यक्षपदासाठी ‘कुमारभाऊ शिंदे’ यांच्यावर शिवसेनेचा विश्वास

महाबळेश्वर नगराध्यक्षपदासाठी ‘कुमारभाऊ शिंदे’ यांच्यावर शिवसेनेचा विश्वास

महाबळेश्वर नगराध्यक्षपदासाठी ‘कुमार भाऊ शिंदे’ यांच्यावर शिवसेनेचा विश्वास

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२५ नगराध्यक्षपदासाठी ‘कुमार भाऊ शिंदे’ यांना शिवसेनेकडून एकमताने उमेदवारी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्धार

महाबळेश्वर: (प्रतिनिधी) –आगामी २०२५ महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर शहर शिवसेनेची महत्त्वाची बैठक नुकतीच महाबळेश्वर येथे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

बैठकीचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक महाबळेश्वर शिवसेना शहर प्रमुख विजय भाऊ नायडू यांनी केले. बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आपले म्हणणे आणि निवडणुकीच्या तयारीबाबत मते मांडली. शहरप्रमुख विजय भाऊ नायडू यांनी चर्चेअंती नगराध्यक्षपदासाठी कुमार भाऊ शिंदे हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या आघाडीच्या मार्फत निवडणूक लढवतील, असा महत्त्वाचा ठराव मांडला. या ठरावाला विभाग प्रमुख हेमंत साळवी व शहर संघटक सुनील ढेबे यांनी त्वरीत अनुमोदन दिले.

एकनाथ शिंदे – शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक

या बैठकीत महाबळेश्वर नगरपालिकेची आगामी निवडणूक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकमताने लढवण्याचा निर्धार करण्यात आला.

नगराध्यक्षपदासाठी एकमताने निवड झाल्यानंतर कुमार भाऊ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “मी सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व शिवसैनिकांना बरोबर घेऊन येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारी करूया. सर्व उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. यासाठी आपण सर्वजणांनी एकत्र, संघटित होऊन निवडणुकीच्या कामाला लागू या. आपण जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.”

उपजिल्हाप्रमुखांकडून प्रामाणिक प्रचाराचे आवाहन

यावेळी अध्यक्षीय भाषणात उपजिल्हाप्रमुख संजय शेलार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवाराचा प्रचार प्रामाणिकपणे करावा आणि उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्यांनी सर्व शिवसैनिकांना एकत्रपणे काम करण्याचे निर्देश दिले.

यावेळी बैठकीस महाबळेश्वर शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडू, शहर संघटक सुनील ढेबे, उपशहर प्रमुख सचिन गुजर, उपशहर प्रमुख सचिन जेधे, अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे संचालक सतीश ओंबळे, विभाग प्रमुख हेमंत साळवी, अल्पसंख्यांक शहरप्रमुख उस्मान खारखंडे, वाई विधानसभा संपर्क वर्षाताई आरडे, पूर्व तालुका महिला मेघा चोरगे, महाबळेश्वर महिला शहरप्रमुख सुनिता ताई फळणे, उपशहर महिला आशाताई जाधव, पश्चिम उपतालुका सोनाली बांदल, पूर्व उपतालुका मंगल ताई फळने, प्रभा नायडू, अपूर्वा डोईफोडे, पूजा उतेकर, तुषार उतेकर,संदीप आखाङे, राहुल साळुंखे, सुमित कांबळे, किरण मोरे आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

या बैठकीमध्ये निवडणुकीच्या कामासाठी एक कमिटी नेमण्यात आली आहे. तसेच, लवकरात लवकर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज महाबळेश्वर शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडू यांच्याकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीचे आभार सोनाली बांदल यांनी मानले आणि ही बैठक अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 57 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket