Home » राजकारण » शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर शहर संघटिका पदी सौ. शिल्पा भिकुभाई ठक्कर, उपशहर संघटिका पदी सौ.वसुधा सचिन बगाडे यांची नियुक्ती

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर शहर संघटिका पदी सौ. शिल्पा भिकुभाई ठक्कर, उपशहर संघटिका पदी सौ.वसुधा सचिन बगाडे यांची नियुक्ती

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर शहर संघटिका पदी सौ. शिल्पा भिकुभाई ठक्कर, उपशहर संघटिका पदी सौ.वसुधा सचिन बगाडे यांची नियुक्ती

महाबळेश्वर प्रतिनिधी -आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख शिवसेना जेष्ठ नेते माननीय श्री दिवाकर जी रावते साहेब तसेच समन्वयक प्रमुख माननीय श्री दगडू दादा सपकाळ साहेब यांच्या सूचनेप्रमाणे व संपर्कप्रमुख माननीय श्री नितीनजी बानुगडे पाटील आणि संपर्क संघटिका सौ युगंधरा साळेकर ताई यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा जिल्हा महिला संघटिका श्रीमती राजश्रीताई भिसे यांचे अध्यक्षतेखाली व माजी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे व माजी जिल्हाप्रमुख राजेश उर्फ बंडा कुंभारदरे यांच्या उपस्थितीमध्ये महाबळेश्वर शहरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,महाबळेश्वर शहर संघटिका महिला, उपशहर संघटिका महिला, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख ,इत्यादी पदांची नियुक्ती करण्यासाठी  हॉटेल सहारा महाबळेश्वर येथे कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये सौ शिल्पा भिकू भाई ठक्कर( अडिया) यांची महाबळेश्वर महिला शहर संघटिका व सौ वसुधा सचिन बगाडे यांची उपशहर संघटिका पदी व सौ गीता भरत भोसले यांची महाबळेश्वर शहर शाखाप्रमुख पदी निवड करण्यात आली तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्याही निवडी याच ठिकाणी जाहीर करण्यात आल्या सर्व पदाधिकारी व नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये माजी जिल्हाप्रमुख श्री राजेश जी कुंभारदरे व यशवंत घाडगे यांनी योग्य ते मार्गदर्शन करून पक्ष वाढीस प्रेरणा देणारे भाषण केले या प्रसंगी राजश्रीताई यांचे हातून शिव बंधन बांधून व नियुक्तीपत्र देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन दादा वागदरे युवा सेना शहरप्रमुख आकाशजी साळुंखे ,शहरप्रमुख राजाभाऊ गुजर ,उपशहर प्रमुख उस्मानभाई खारखंडे ,विभाग प्रमुख अशोक धाकू ढेबे,विभाग प्रमुख राजेंद्र शंकर पंडित ,पत्रकार राजेश सोंडकर शाखाप्रमुख शहानवाज खारकंडे महाबळेश्वर पश्चिम तालुकाप्रमुख सुजाता मोरे ,पूर्व विभाग प्रमुख लक्ष्मीताई मालुसरे ,वाहतूक सेना शहर प्रमुख राजेंद्र बोधले,नाकिंदा येथील कट्टर शिवसैनिकअसिफ महाबले आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन महेश (राजा )गुजर यांनी केले तर आभार राजेंद्र पंडित यांनी मानले

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket