Home » ठळक बातम्या » शिवजयंती उत्सव समितीच्या पाठपुराव्यास यश महाबळेश्वरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी ‘जिल्हा नियोजन फंडातून’ भरीव निधी मंजूर

शिवजयंती उत्सव समितीच्या पाठपुराव्यास यश महाबळेश्वरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी ‘जिल्हा नियोजन फंडातून’ भरीव निधी मंजूर

शिवजयंती उत्सव समितीच्या पाठपुराव्यास यश महाबळेश्वरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी ‘जिल्हा नियोजन फंडातून’ भरीव निधी मंजूर

महाबळेश्वर: (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा गौरव असलेल्या महाबळेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी अखेर निधी मंजूर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवजयंती उत्सव समिती महाबळेश्वर आणि शिवभक्तांनी केलेल्या अथक पाठपुराव्याला या निमित्ताने मोठे यश मिळाले आहे.

मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे विशेष प्रयत्न:

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन फंडातून उपलब्ध झाला आहे. यासाठी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री श्री नामदार शंभूराजे देसाई साहेब, जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील साहेब, आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री. छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व मान्यवरांच्या सहकार्यामुळेच हे शिवकार्य पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवजयंती उत्सव समितीकडून जाहीर आभार:

चौकाचे सुशोभीकरण झाल्यास महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणखी भर पडेल आणि महाराजांचे प्रेरणादायी स्थान अधिक आकर्षक होईल. या निधीमुळे शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवजयंती उत्सव समिती महाबळेश्वरने या सर्व लोकप्रतिनिधींचे जाहीर आभार मानले आहेत. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवभक्तांनी घेतलेल्या कष्टामुळे आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा ऐतिहासिक निर्णय झाला, असे मत समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

शिवजयंती उत्सव समितीचे मत:

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या चौकाचे सुशोभीकरण हे केवळ काम नाही, तर ती शिवभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे. लोकप्रतिनिधींनी आमच्या मागणीची दखल घेऊन तत्काळ निधी उपलब्ध केल्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.”आता लवकरच या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे काम सुरू होऊन महाबळेश्वर शहराच्या वैभवात भर पडेल, अशी अपेक्षा शिवभक्तांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 57 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket