शाहूपुरी पोलिसांवर दबाव असेल तर मनसे पद्धतीने बंदोबस्त करण्यात येईल –राहुल पवार
सातारा -छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक विधेयक उपक्रम राबवले आहेत या उपक्रमाला सातारा जिल्हा प्रशासन, पोलीस दल व जनतेचा नेहमीच पाठिंबा मिळत आहे. परंतु काही वेळेला सातारा जिल्ह्यात कायदा हातात घेऊन जर कोणी धुडगूस घालत असेल. तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास सातारा पोलीस सक्षम आहे. या व्यतिरिक्त शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये जर परप्रांतीयांचा दबाव असेल तर मनसे पद्धतीने चोख बंदोबस्त करू असा गर्भित इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा शहराध्यक्ष श्री राहुल पवार व मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.
काल शुक्रवार दिनांक १४ मार्च रोजी सातारा शहरात नजीक असलेल्या शाहूपुरी परिसरात सर्व हिंदू बांधवांनी अत्यंत शांततेने व सर्वधर्मसमभावाप्रमाणे धुलीवंदन साजरा केला. त्याचे आम्ही स्वागतच करतो.
परंतु काही नागरी वस्ती व कॉलनीमध्ये परप्रांतीय टोळक्यांनी नशा पान करून कपडे फाडून शाहूपुरी मध्ये अर्ध नग्न अवस्थेत अक्षरशः स्थानिकांवर दहशत निर्माण केली. सदरचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक नागरिकांनी तोंडी स्वरुपाच्या तक्रारी केलेले आहेत. याबाबत स्थानिकांनी सर्व पुराव्यासह समाज माध्यमातून संबंधित शाहूपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. अद्यापही कारवाई होऊ शकली नाही. याची खंत वाटते. जर शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये परप्रांतीयांच्या दबावापोटी जर कारवाई होत नसेल तर नाईलाजाने मनसे पद्धतीने त्या टोळक्याला समजावण्यात येईल, त्यापूर्वीच कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या सातारा पोलिसांनी कर्तव्य दक्षतेने कारवाई करावी. हिंदू बांधवांच्या सर्व सणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. याचा वेगळा अर्थ कुणी काढून स्थानिकांना त्रास देत असेल. तर माननीय पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे व माजी मंत्री बाळा नांदगावकर, श्री शिरीष सावंत, नितीन सर देसाई यांच्या आदेशानुसार सातारा शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व मनसे सैनिक भूमिका घेऊ ते स्थानिकांच्या हितासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. त्यापूर्वीच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर वृत्ताची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी. त्यांना महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामगिरीची ओळख करून देऊन त्यांना समज दयावी. असेही स्पष्ट केले आहे. यावेळी मनसे शहरा उपाध्यक्ष भरत रावळ, प्रशांत सोडमिसे, वैभव वेळापुरे, संतोष सासवडकर, अझर शेख, ओमकार साळुंखे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
