Post Views: 177
ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली सदिच्छा भेट
सातारा :ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे नामदार जयकुमार यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नामदार जयकुमार यांनी आशिर्वाद घेऊन विविध विषयावर चर्चा केली.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पद मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील अभ्यास असलेले जेष्ठ समाजसेवक आण्णांची भेट ऊर्जा देणारी असल्याचे नामदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.यावेळी सोबत ॲड.आमदार राहुल कुल , आमदार काशिनाथ दाते , भाजपा सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. धैर्यशील कदम उपस्थित होते.