सातारा हॉस्पिटल, सातारा डायग्नोस्टिक सेंटर यांच्यावतीने मानसिक ताण तणाव व आरोग्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.
सातारा -सातारा हॉस्पिटल सातारा डायग्नोस्टिक सेंटर,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ आणि ‘कृतिशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संघ, सातारा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात “मानसिक ताणतणाव व आरोग्य” या विषयावर व्याख्याते फिजीशियन, कन्सल्टटन्ट डॉक्टर दत्तात्रय मोरे यांनी उपस्थितानांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात. कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे अधिकारी अनुभवी, निवृत्त अधिकारी, सदस्य,कर्मचाऱ्यांचा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ येथील स्टाफ कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.तणाव ओळखणे, शारीरिक-मानसिक आरोग्याचे परस्परसंबंध, आणि दैनंदिन आयुष्यातील साध्या सवयींमधून तणाव व्यवस्थापनाचे मार्ग या विषयांवर सुसंवाद झाला.
सातारा हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, सातारा डायग्नोस्टिक सेंटर यांच्या तर्फे वैद्यकीय सेवेतील आरोग्य विषयक विविध व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत असते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्षस्थान डॉ. जयश्री शिंदे मॅडम,यांनी भूषवले,विदयापीठ स्टाफ डॉ.नामदास,डॉ प्रमोद चव्हाण, व डॉ चंद्रकांत नलवडे तर या कार्यक्रमासाठी डॉ. सुरेश शिंदे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
श्रीकांत देशमुख पब्लिक रिलेशन मॅनेजर सातारा हॉस्पिटल सातारा,यांनी अत्यंत प्रभावी समन्वय साधून हा कार्यक्रम यशस्वी केला. कृतिशील संघटनेच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.





