सातारा (गोडोली )तलावात बसवण्यात येणाऱ्या छ.संभाजी महाराजांच्या भव्य-दिव्य तब्बल २७ फुटी स्मारकाची खा.उदयनराजे भोसले व समितीच्या सदस्यांकडून पाहणी
सातारा -राजधानी साताऱ्यातील ऐतिहासिक गोडोली तलावात बसवण्यात येणाऱ्या 27 फूटी उंच व भव्य अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाची पाहणी छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान च्या सर्व सदस्यां समवेत पुण्यात जाऊन केली. यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ,प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हरीश पाटणे व सदस्यांनी कामाबाबत शिल्पकारांना मौलिक सूचना केल्या. सुरु असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त करून पुतळा उभारणी कामी सर्व ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.
श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे श्री.शरद काटकर, श्री.काका धुमाळ, सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री किशोर शिंदे, श्री मनोज शेंडे, श्री.संग्राम बर्गे, माजी नगरसेवक श्री अमित कुलकर्णी, अॅड श्री विनित विलास पाटील, श्री.गोलू साळुंखे, श्री.इर्शाद बागवान, श्री.सुजित जाधव, श्री.अमोल तांगडे, श्री.अभिजित बारटक्के, श्री.अजिंक्य गुजर, सातारा नगरपालिकेचे श्री चिद्रे, मूर्तिकार श्री संजय परदेशी, श्री.शैलेश वरखडे व शिव भक्त यावेळी उपस्थित होते.
