सातारा जिल्हा कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेची बुधवारी सभा
सातारा: जिल्हा कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेची विशेष सभा बुधवार, दि. ३० जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे आयोजित केली आहे.
सातारा हॉस्पिटल व सातारा डायग्नोस्टिक सेंटर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार – मंडळ व सातारा जिल्हा कृतिशील
संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह तज्ञ डॉ. दत्तात्रय मोरे यांचे ‘मानसिक ताणतणाव व आरोग्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आदर्श जीवनशैली कशी असावी या विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विजयकुमार कुंभार, संचालक डॉ. प्रमोद चव्हाण, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, सातारा हॉस्पिटलचे संपर्क अधिकारी श्रीकांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कृतिशील संघटनेच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत नलवडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. सौ. जयश्री शिंदे, कार्याध्यक्षा प्रा. शालिनी जगताप, सचिव ज्ञानेश्वर ढाणे, उपाध्यक्ष नाथाजी बाबर व अध्यक्ष शंकरराव भगत यांनी केले आहे.





