सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस यवतेश्वर घाटात दरड कोसळली
सातारा -साताऱ्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सातारा शहरालगत यवतेश्वर घाटात दरड कोसळली असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. घाटात सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. दरड हटवून वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर पाटण सातारा तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी फळझाडे पिकांचे नुकसान झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात शनिवारी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसंच कास मार्गावर दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
चिंचणेर परिसरात ढगफुटी सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन परिसरात ढगफुटी झाल्यानं हाहाकार पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे काही वेळातच ओढ्यांना पूर येऊन रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले. पाण्यातून वाहून जाणारी चारचाकी वाहने जेसीबीच्या साह्यानं बाहेर काढावी लागली. तसंच लोकांचं साहित्य ओढ्याच्या पुरात वाहून गेलं. त्यामुळं नागरीकांचं मोठं नुकसान झालं. सातारा शहरा लगत असणाऱ्या कुरणेश्वर मंदिरात पावसाच्या प्रचंड पाण्यामुळे अनेक दुचाकी वाहून गेल्या आहेत.
