Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेवून जिल्हयामध्ये सर्व साखर कारखान्यांची एकत्रित बैठकांचे आयोजन

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेवून जिल्हयामध्ये सर्व साखर कारखान्यांची एकत्रित बैठकांचे आयोजन

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेवून जिल्हयामध्ये सर्व साखर कारखान्यांची एकत्रित बैठकांचे आयोजन

गेल्या काही वर्षामध्ये ऊस वाहतूकीसंदर्भात जिल्हयातील ऊस वाहतुकदरांमध्ये एकसुत्रीपणा नसल्यामुळे वाहतूकदार व साखर कारखान्यांमध्ये आर्थिक कारणांमुळे समस्या निर्माण होत होत्या . यावर मार्ग काढणेसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेवून जिल्हयामध्ये सर्व साखर कारखान्यांची एकत्रित बैठकांचे आयोजन केले . सदर साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुक दरासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकांकरीता साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, शेती अधिकारी उपस्थित होते . सदर सभांकरीता बँकेचे संचालक मा .आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष मा .श्री .नितीन पाटील, माजी आमदार मा .श्री .प्रभाकर घार्गे यांनी पुढाकार घेवून संपूर्ण सातारा जिल्हयातील एकूण १८ साखर कारखा-यांचा ऊस तोडणी व बैलगाडी, ट्रॅक्टर गाडी, ट्रक/ट्रॅक्टर चारचाकी ट्रोली वाहतूकीचा तसेच ऊस तोडणी मशिन इत्यादिंसह सर्व यंत्रणांचे संपूर्ण जिल्हयाकरीता एकच ऊस तोडणी वाहतूक व कमिशनचे दरपत्रक आज दि .१४/०६/२०२४ रोजी सादर करुन सर्व साखर कारखान्यांनी सदर दरपत्रपत्रकास मान्यता दिली असून त्यानुसार सर्व साखर कारखान्यानी अंमलबजावणी करणेचे निश्चित केले .

साखर कारखान्यांचे ऊस वाहतूक दर व कमिशनबाबत वेळोवेळी आयोजित केलेल्या बैठकांकरीता बँकेचे संचालक मा .आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष मा .श्री .नितीन पाटील, मा .श्री .प्रभाकर घार्गे, मा .श्री .प्रदीप विधाते व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे उपस्थित होते .

याप्रसंगी आदर्शवत दरपत्रक ठरविलेबद्दल साखर कारखान्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांनी बँकेचे मा .आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा .अध्यक्ष श्री .नितीन पाटील, मा .श्री .प्रभाकर घार्गे, मा .श्री .प्रदीप विधाते व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन करुन आभार मानले .

यासभेस बँकेचे अध्यक्ष मा .श्री .नितीन पाटील, जिल्हयातील साखर कारखान्याचे चेअरमन, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री .रनवरे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री .मोहिते, सहयाद्रि सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री .आबासाहेब पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सह .साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री .देसाई तसेच सर्व कारखान्यांचे शेती अधिकारी उपस्थित होते .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket