सातारा जिल्यात भाजप सदस्य नोंदणी! ‘तारीख पे तारीख’ सदस्य जुळता जुळेना
सातारा : सदस्य नोंदणीआधारे जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा भाजपतर्फे पूर्वीच्या नोंदणी संख्येच्या आधारावर करण्यात आला होता. यावेळी मात्र नोंदणीत पिछाडी दिसत आहे. मुदत आटोपली पण निम्मेही उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याची स्थिती आहे. हे तेवढेच खरे की आमदार व त्याखालील जिल्हा पदाधिकारी सर्व कामे सोडून हेच काम हाती घेऊन बसले आहे.सातारा जिल्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळून सर्वाधिक चार आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत.
वरिष्ठ प्रदेश पदाधिकारी नियमित आढावा घेत आहे. पण मुदतीत काम होत नसल्याचे चित्र आहे. हे पाहून आता तिसऱ्यांदा नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे.राज्याचे लक्ष्य दीड कोटी सदस्य नोंदणीचे आहे. ते बरेच दूर आहे.राज्यातील बहुतांश जिल्ह्यात नोंदणीचे चित्र समाधानकारक नसल्याने मुदतवाढ मिळाली असल्याचे एका संघटन नेत्याने सांगितले.
