साताऱ्याचे वैभव फरोख कूपर
ट्रॅक्टर निर्मिती उद्योगाचा शनिवारी शुभारंभ कूपरने तयार केलेल्या पहिल्या ट्रॅक्टरचे अनावरण
सातारा प्रतिनिधी –साताऱ्याच्या मातीशी अनुरूप झालेले एक शिरोमणी कुटुंब म्हणजे कूपर घराणे सामाजिक बांधिलकी जोपासून अलौकिक आदर्श उभे करणारे हे घराणे. त्याची मुहूर्तमेढ रोवली ती धनजीशा कूपर यांनी, नरिमन कूपर यांनी ही गुडी समर्थपणे उंचावली. फरोख कूपर यांनी गुढीची पताका अविरतपणे लहरत ठेवली.
कूपर उद्योग समुहाने ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रात पर्दापण केले असून या प्रकल्पाचा शुभारंभसोहळा शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. याचवेळी कूपरने तयार केलेल्या पहिल्या ट्रॅक्टरचे अनावरणही होणार असल्याची माहिती कूपर कार्पोरेशनचे चेअरमन फरोख कूपर यांनी दिली.
दि. १ फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खा.श्री.छ.उदयनराजे भोसले, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, मदत व पुनवर्सन मंत्री ना. मकरंद पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. हा शुभारंभसोहळा कूपर कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, ट्रॅक्टर डिव्हीजन, सातारा येथे आयोजित केला असल्याचेही कूपर यांनी सांगितले.
कूपर उद्योग समुहाचे ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील पाऊल साताऱ्याच्या औद्योगिक विकासास चालना मिळणारे आहे. “या प्लांटद्वारे राज्यातील औद्योगिक वाढीसोबतच रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण केल्या आहेत. कूपर ट्रॅक्टर प्लांट ही खरोखरच मेक इन इंडिया मोहिमेची खरी कहाणी आहे. समस्त सातारकरांना याचा अभिमान असणार आहे.
