Post Views: 248
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा
सातारा: सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोड घडण्याआधी पूर्वीच मोठी एक बातमी समोर येत आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा होती.
आज (दि. ५) सकाळीच आयकर विभागाचे एक पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले. सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या नाईक निंबाळकरांच्या बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश करू दिला जात नाही.
