अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » लोकशाही रणांगणातील लढवय्ये अण्णाभाऊ साठे यांना ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

लोकशाही रणांगणातील लढवय्ये अण्णाभाऊ साठे यांना ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

लोकशाही रणांगणातील लढवय्ये अण्णाभाऊ साठे यांना ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

सातारा नगरपरिषदेच्या वतीने लोकशाही रणांगणातील लढवय्ये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास तसेच भारतरत्न. डॉ बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सातारा नगरपरिषदेचे माननीय नगराध्यक्ष श्री. अमोल मोहिते, माननीय उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी.बनकर,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)जिल्हाध्यक्ष श्री अशोक बापू गायकवाड नगरपालिका आर्थिक दुर्बल घटक सभापती श्री संकेत साठे,नगरसेविका सावित्री बडेकर,अर्चना कांबळे,तसेच सचिन कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला आदरांजली वाहिली.

यावेळी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक समतेसाठीचा संघर्ष आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमास नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket