- सातारा शहरातील साखरी तळ्यास जलपर्णी वेलींचा विळखा रोगराईला निमंत्रण ,दूषित जलसाठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सातारा- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जुना मोटर स्टँड परिसरात असलेले बांधिव साखरी तळ्याला सध्या जलपर्णी वेलीचा विळखा पडला आहे अनेक वर्षापासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असलेल्या या तळ्याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे आढळून येत आहे नागरी वस्तीमध्ये असलेल्या या तळ्यातील पाणी दूषित झाले असून ते नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे जुना मोटर स्टँड परिसरातील हे ऐतिहासिक तळ्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे त्यामुळे जीव जंतूंचा फैलाव वाढला आहे या तळ्याची स्वच्छता व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे सातारा नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी आढे नाले स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे अशीच मोहीम शहरातील विहिरी तलावासाठी राबवावी शहरातील ऐतिहासिक मोती तळे स्वच्छता करण्यात आले मंगळवार तळे ही स्वच्छ झाले मग साखरी तळ्याच्या स्वच्छता कडे दुर्लक्ष का याबाबत नागरिकांमधून उलट सुलट चर्चा होत आहे
चौकट – साखरीतळे हा शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे तळ्याची स्वच्छता बरोबरच तेथील पाण्याचा नियमित उपसा होणे गरजेचे आहे नागरी वस्ती मधील या तळ्याची निगा राखली गेली पाहिजे सध्या या तळ्याची दयनीय अवस्था झाली असून तळ्याच्या संरक्षक भिंती नाहीशा झाल्या आहेत या तळ्यात अनेकदा मूक प्राणी पडल्याच्या घटना घडल्या आहेत
पावसाळ्यापूर्वी सातारा जिल्ह्यातील विहिरी तळी स्वच्छ करावीत असे आदेश जिल्हाधिकारी सो यांनी सर्व नगरपालिका प्रशासनास दिले आहे याची अंमलबजावणी व्हावी ही नागरिकांची अपेक्षा आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तळी विहिरी स्वच्छ होणे गरजेचे आहे साथीच्या रोगांचा फैलाव होवू नये याची संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी
श्रीरंग काटेकर सातारा