Post Views: 46
सह्याद्री साखर कारखान्यासाठी आज मतदान
सातारा प्रतिनिधी – कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील २१ जागांसाठी कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यांतील ९९ मतदान केंद्रांवर आज शनिवारी (५) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चुरशीने मतदान होत आहे. कराड तालुक्यातील ४९ गावांत ६८, कोरेगाव तालुक्यात ८ गावांत १५, सातारा तालुक्यातील ५ गावांत ६, खटाव तालुक्यातील ३ गावांत ५ आणि कडेगाव तालुक्यातील ३ गावांत ५ मतदान केंद्रे असणार आहेत. सह्याद्री कारखान्याचे ३२ हजार २०५ सभासद मतदार असून ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आमदार मनोजदादा घोरपडे, माजी आमदार बाळासाहेब पाटील,धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, निवासराव देसाई या प्रमुख नेत्यांच्या तिन्ही आघाडींची जोरदार मोर्चे बांधणी यावेळी जनतेला पहावयास मिळणार आहे.
