Home » राज्य » शिक्षण » RTE प्रवेश!! विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘आरटीई’ प्रवेश; शुक्रवारपासून नव्याने करावे लागणार अर्ज

RTE प्रवेश!! विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘आरटीई’ प्रवेश; शुक्रवारपासून नव्याने करावे लागणार अर्ज

RTE प्रवेश!! विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘आरटीई’ प्रवेश; शुक्रवारपासून नव्याने करावे लागणार अर्ज

आरटीई’ प्रवेशाच्या नियमातील दुरूस्ती रद्द करून आता इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवेश मिळणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यानुसार बदल करून प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील आदेश शिक्षण संचालकांना दिले आहेत. येत्या शुक्रवारपासून नव्या आदेशानुसार पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.

सुधारित आदेशानुसार ‘आरटीई’ प्रवेशाच्या पोर्टलमध्ये बदल करावा लागणार आहे. शिक्षण खात्याने ‘एनआयसी’ला तशा सूचना केल्या असून त्यासाठी किमान तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे नवीन आदेशानुसार शुक्रवारपासून (ता. १७) ‘आरटीई’ प्रवेशाला सुरवात होणार आहे. नवीन बदलानुसार म्हणजेच पूर्वीप्रमाणे आता पालकांना त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील शाळा निवडता येणार आहे. इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आठवीपर्यंतचा खर्च शासनाकडून संबंधित शाळांना दिला जाणार आहे.

सर्वांनाच नव्याने अर्ज करावे लागणार

शासनाने ‘आरटीई’च्या नियमात बदल केल्यानंतर अर्ज भरण्यास सुरवात झाली होती. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील दोन लाख ११ हजार पालकांनी अर्ज केले होते. त्यातील जवळपास ६८ हजार पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित केले होते. दुसरीकडे खासगी अनुदानित शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेतील २५ टक्के जागा रिक्त ठेवून ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. पण, आता शासनाने पुन्हा नियमात बदल करून पूर्वीप्रमाणे प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच पालकांना आपल्या पाल्यांसाठी पुन्हा एकदा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket