पाचगणी एस.टी. आगारातील वाहतूक नियंत्रक पोपटराव सोनावणे यांचा सेवानिवृत्ती सत्कार
पाचगणी (प्रवीण घाडगे ): पाचगणी एस.टी. आगारातील वाहतूक नियंत्रक श्री. पोपटराव सोनावणे यांचा सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. त्यांनी तब्बल ३० वर्षे राज्य परिवहन विभागात सेवा बजावली असून, त्यापैकी शेवटची २ वर्षे पांचगणी आगारात कार्यरत राहून आपल्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीने आपली छाप पाडली.
या कार्यक्रमात वाहतूक नियंत्रक श्री. जे.पी. शिर्के (पर्यवेक्षक), पांचगणी वाहतूक नियंत्रक डि.डी. राजपूरे (पर्यवेक्षक) तसेच सफाई कामगार श्री. राकेश लालबेग यांच्या हस्ते सोनावणे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार कार्यक्रमात टॅक्सी युनियन, पांचगणी यांच्या वतीनेही विशेष गौरव करण्यात आला. यावेळी युनियन अध्यक्ष श्री. सुनिल पार्टे, मोरेश्वर कासुर्डे, उदय जाधव, राजाराम रांजणे, मनोज कळंबे, अजित मालूसरे, अजय सपकाळ, प्रसाद कासुर्डे तसेच हॉटेल व्यवसायीक श्री. अशोक कांबळे उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांनी सोनावणे यांच्या सेवेतील शिस्त, वेळेची जाण आणि निष्ठेचे कौतुक करत, त्यांच्या निवृत्ती जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.




