Home » Uncategorized » निधन वार्ता » निधन वार्ता » विठ्ठलाचं नामस्मरण करत घेतला अखेरचा श्वास निसराळे गावचे ह.भ.प.विजय जगन्नाथ देशमुख तथा बापू महाराज (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

विठ्ठलाचं नामस्मरण करत घेतला अखेरचा श्वास निसराळे गावचे ह.भ.प.विजय जगन्नाथ देशमुख तथा बापू महाराज (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

विठ्ठलाचं नामस्मरण करत घेतला अखेरचा श्वास निसराळे गावचे ह.भ.प.विजय जगन्नाथ देशमुख तथा बापू महाराज (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सातारा :विठ्ठलाचं नामस्मरण करत घेतला अखेरचा श्वास, कार्तिकी वारीत चालताना सातारा तालुक्यातील निसराळे गावचे ह. भ. प. विजय जगन्नाथ देशमुख तथा बापू महाराज (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधनकार्तिकी वारीत चालताना सातारा तालुक्यातील निसराळे गावचे ह. भ. प. विजय जगन्नाथ देशमुख तथा बापू महाराज (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भुईंज (महेंद्रआबा जाधव )भागवत संप्रदायात वर्षातून दोन महाएकादशी असतात. पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते. आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते. 

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. म्हणजे त्या दिवशी शेषावर बसलेले भगवान विष्णू शयनाला, आराम करायला जातात. तर कार्तिकीच्या आधी उठतात. त्यामुळे या एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात. त्यामुळे या दोन्ही एकादशीला वैष्णव संप्रदायात अनन्य साधारण महत्त्व आहे. हा भागवत संप्रदाय आहे इथे दोन्ही कडून क्रिया होते. भक्तांकडून भगवंताकडे व भगवंताकडून भक्तांकडे. कार्तिकाला मी माझ्या भक्ता साठी त्या त्या संताच्या स्थानावर जाईल अशी भूमिका देवाची असते. हे सर्व भागवत संप्रदाय व्यतिरिक्त कुठेच घडत नाही. कार्तिकीला अनन्य महत्व का असेल तर भगवान विठ्ठल हे कार्यान्वित होतात व आळंदीची कार्तिकी एकादशी येते.

या कार्तिकी वारीला जात असताना रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी ह. भ. प. विजय जगन्नाथ देशमुख तथा बापू महाराज यांना सायं. ६ वा. सातारा जिल्ह्यातील फलटण लगत तीव्र हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. ही वार्ता निसराळे  गावी समजताच संपूर्ण गावावर तसेच भागवत सांप्रदाय परिवारात शोककळा पसरली. कै. बापू महाराज यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, सुन, दोन मुली, व नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 7 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket