रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची सन २०२५ – २६ मधील बैठक संपन्न
सातारा -रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची सन २०२५ – २६ मधील बैठक सातारा येते संपन्न झाली. यावेळी देशाचे सर्वोच्च नेते माननीय माजी कृषिमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मॅनेजिंग कौन्सिलच्या धोरणांशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एआय तंत्रज्ञान शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणं, अभिमत विद्यापीठांचे विस्तारीकरण करण्यासह त्यांच्या सक्षमीकरणावर भर देणं, थ्री.डी. प्रिंटिंग आणि मशीन लर्निंग व आयओटी आदी विषयांवर आधारित अभ्यासक्रम संस्थेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध करून देणं यांसारख्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, तंत्रज्ञान, आरोग्य इत्यादी क्षेत्रातील चालू घडामोडींविषयीचे लेख ‘रयत’ या मासिकातून प्रसिद्ध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
