Home » राज्य » राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर निवडणूक आयोग अखेर नमले

राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर निवडणूक आयोग अखेर नमले

काॅंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर निवडणूक आयोग अखेर नमलं आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदार यादीचा डेटा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्याबाबत राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखानंतर चौफेर टीका होऊ लागल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे, असं बोललं जात आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आता राहुल गांधी यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. राहुल गांधी यांनी X वर एक पोस्ट करत निवडणुकांचा डेटा शेअर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी विचारले आहे की, हा डेटा डिजिटल, मशीन-रीडेबल फॉरमॅटमध्ये कधी शेअर केला जाईल, याची नेमकी तारीख निवडणूक आयोग जाहीर करू शकेल का?

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत ढळढळीत हेराफेरी केली गेली. ही निवडणूक भाजपने चोरली. ही छोटी-मोठी गडबड नसून, आपल्या राष्ट्रीय संस्थांवर कब्जा करून मोठ्या प्रमाणावर घोटाळे केले जात आहेत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका लेखाद्वारे केला. त्यांच्या या लेखामुळे केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि निवडणूक आयोग यांच्या मॅच फिक्सिंग कारभारावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यातच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदार यादीचा डेटा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket