Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पुण्याच्या हिंजवडी आयटी हबमध्ये झालेल्या भयंकर आगीत चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

पुण्याच्या हिंजवडी आयटी हबमध्ये झालेल्या भयंकर आगीत चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

पुण्याच्या हिंजवडी आयटी हबमध्ये झालेल्या भयंकर आगीत चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

  1. पुणे -पुण्याच्या हिंजवडी आयटी हबमध्ये झालेल्या भयंकर आगीत चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या या भीषण आगीत बसमधील सीटचा केवळ सांगाडा उरला आहे. दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीच्या बसमध्ये घडली. सकाळच्या सुमारास कर्मचारी कामावर जात असताना टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण गाडी कवेत घेतली. ट्रॅव्हलरमध्ये एकूण 12 कर्मचारी होते, त्यातील 6 जण सुखरूप बाहेर पडले, मात्र चार जण बसच्या मागील भागात अडकल्याने ते बाहेर पडू शकले नाहीत.

मागच्या दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजा लॉक झाल्याने तो उघडता आला नाही. परिणामी चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग इतकी तीव्र होती की मृतदेह ओळखणेही कठीण झाले आहे.

अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत आगीने थैमान घातले होते. बसला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि अग्निशमन विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.ही दुर्घटना पुण्यातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. दरवाजा लॉक का झाला? बसमध्ये अग्निरोधक यंत्रणा होती का? यासारख्या मुद्द्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket