Home » गुन्हा » पुणे – सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या ४ गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक.

पुणे – सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या ४ गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक.

पुणे – सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या ४ गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक.

वाई प्रतिनिधी – ११ जुन रोजी रात्री भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि .रमेश गर्जे, पोउपनिरीक्षक विशाल भंडारे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे शासकीय वाहनातून सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलींग करीत असताना सपोनि गर्जे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे वेळे ता. वाई गावचे हद्दित करुणा मंदिराचे समोरील बाजुस, पुणे ते सातारा हायवे रोडचे पूर्व बाजुला झाडीमध्ये अंधारात पाच लोक त्यांच्या मोटर सायकल बाजुला लावून बसले असुन ते महामार्गा वरुन जाणा-या लक्झरी बस लुटणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने सपोनि गर्जे यांनी याची माहीती तात्काळ जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अपर पोलिस अधिक्षक. आंचल दलाल वाईचे डिवाय एसपी बाळासाहेब भालचीम तसेच एलसीबीचे पोलिस निरिक्षक अरुण देवकर, यांना माहिती दिली. त्यांनी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयीतांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

वरिष्ठांनी दिलेल्या सुचने प्रमाणे सपोनि रमेश गर्जे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी- अंमलदार यांनी साध्या वेशात मिळाले माहितीचे ठिकाणी जावून खात्री केली. त्यानंतर सोबतच्या पथकांनी सापळा लावुन रात्री ८\३० वाजण्याच्या सुमारास अंधारात बसलेल्या व दरोडयाच्या तयारीत असलेल्या ४ संशयीतांना रमेश गर्जे यांच्यासह पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.

त्यांच्या सोबत असलेला पाचवा साथीदार हा अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. परंतु ताब्यात घेतलेल्या संशयीतांकडे विचारपूस केली असता ते पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यातुन येवून खंबाटकी घाटामध्ये लक्झरी बस अडवून त्यातील प्रवाशांचे दागिने, पैसे लुटण्यासाठी त्या ठिकाणी थांबले असल्याचे त्यांनी सांगीतले. पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडती मध्ये एक सुरा, दोन लोखंडी रॉड, प्लॅस्टिकच्या पिशवीत मिरचीची पुड, मोबाईल तसेच दोन मोटर सायकल असे एकूण २ लाख ७९ हजार रुपयाचे साहित्य मिळुन आले आहे.

याबाबत डिबीचे पो.कॉ. रविराज वर्णेकर यांच्या तक्रारी वरुन भुईज पोलीस ठाणे गु.र.नं 198/2024 भादयिस कलम ३९९ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन पळून गेलेला आरोपी हा ३० ते ३५ वयोगटातील असुन त्या आरोपीचा शोध सुरु आहे.

संतोष बाळासाहेब चव्हाण वय ३४ अक्षय दत्तात्रय शितोळे वय २६ योगेश आनंदा वाळुंज वय २५ तिघेही राहणार शिंदोडी ता .शिरुर जिंल्हा पुणे .सिध्दांत यशवंत कांबळे वय ३१ राहणार निमोने ता.शिरुर जिंल्हा पुणे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत .

जिंल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, वाईचे डिवायएसपी बाळासाहेब भालचीम एलसीबीचे पोलिस निरिक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शना खाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, पो.उप-नि. विशाल भंडारे, पोलीस अंमलदार ज्ञानदेव राजे, नितीन जाधव, आप्पासाहेब कोलवडकर, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, अजय सपकाळ, सुहास कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला असुन कारवाई मध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा अपर पोलीस अधीक्षक . उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 13 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket