पुणे सातारा महामार्गा वरील वेळे गावच्या हद्दीत कंटेनरने महिलेला चिरडले
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे सातारा महामार्गावरील वेळे गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटाच्या तिव्र उतारा वरून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पुढे चालत असलेल्या दुचाकीला पाठी मागुन जोराची धडक दिल्याने त्यावरील पाठी मागे बसलेल्या महिला महामार्गावर पडल्याने व त्यांच्या डोक्यावरून कंटेनरची चाके गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.
या भिषण अपघाताची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे यांना समजताच त्यांनी तातडीने हवलदार एस.एस.जाधव .आणी शिवाजी तोरडमल या दोघांना पाठवले.त्यांनी मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून तो शवविच्छेदना साठी कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे .
कंटेनरसह चालकाला ताब्यात घेवुन त्याच्या वर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सौ.दुर्गा विजय जाधव वय ३८ असे मृत महिलेचे नाव आहे.
भुईंज पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार एस.एस.जाधव . यांनी दिलेली माहिती अशी की विजय जाधव वय ४३ आणी त्यांची पत्नी दुर्गा विजय जाधव वय ३८ दोघेही राहणार ऊपळी पोस्ट करंदी तालुका जिल्हा सातारा हे दोघेजण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे येथुन पुणे सातारा महमार्गावरुन सातारा जिल्ह्यातील ऊपळी या आपल्या मुळ गावी जाण्या साठी आपल्या मालकीच्या दुचाकी वरुन निघाले होते सायंकाळी. ४ वाजुन १५ मिनिटांनी त्यांची दुचाकी वेळे गावच्या. हद्दीत असणार्या खंबाटकी घाटाचा तिव्र असणारा उतार उतरत असताना ते वेळे गावच्या हद्दीत आले असता त्यांच्या पाठी मागुन खंबाटकी घाट उतरून भरघाव वेगात येणाऱ्या कंटेनरने पाठी मागुन जोराची धडक दिल्याने दुचाकी वर बसलेल्या सौ.दुर्गा जाधव या महामार्गावर पडल्या त्या वेळी कंटेनर चालकाचा वाहना वरील ताबा सुटल्याने कंटेनरची चाके त्यांच्या डोक्या वरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला .
आपल्या समोरच आपल्या पत्नीचा अशा भयानक पध्दतीने झालेला मृत्यू पाहुन पती विजय जाधव यांनी एकच हंबरडा फोडला . ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या या अपघाताचे दृश्य पाहून इतर वाहन चालकांच्याही डोळ्यात पाणी येत होते . अपघात स्थळावर जमलेल्या वाहन चालकांनी विजय जाधव यांना आधार दिला .
