Home » Uncategorized » क्राईम डायरी » पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत चालत्या कारवर आज्ञात टोळीने सराफस लुटले वीस लाख रुपयांची लूट झाल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत चालत्या कारवर आज्ञात टोळीने सराफस लुटले वीस लाख रुपयांची लूट झाल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत चालत्या कारवर आज्ञात टोळीने सराफस लुटले वीस लाख रुपयांची लूट झाल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ

वाई प्रतिनिधी(शुभम कोदे)-पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी मध्यरात्री कामोठे मुंबई येथून विटा जिल्हा सांगली कडे निघालेल्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांस पाठलाग करत वेळे ता.वाई येथे खंबाटकी घाट उतरून कार आडवी लावून मारहाण करून लुटल्याने भुईंज पोलीस ठाण्यात व जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सह खळबळ उडाली आहे.,

      या बाबत अधिक माहिती अशी की शनिवारी मध्यरात्री कामोठे मुंबई येथून विटा या गावाकडे निघालेल्या व्हेन्यू कार नंबर MH01 ER9468 या कारला पाठीमागून आलेल्या इनोव्हा व स्कॉर्पिओ मधील 6 ते सात लोकांनी मारहाण करून कार च्या काचा फोडल्या कार मध्ये असलेली वीस लाखांची रक्कम घेऊन कार मधील 3 जणांना सर्जापूर ता. जावली गावचे हद्दीत सोडले त्यांचे हात पाय बांधले असल्याचे ही समजते. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे,घटनास्थळी भुईंज पोलिसांनी तातडीने राबवलेल्या तपास व पाठलाग करून शोध मोहीम राबवली शनिवारी सायंकाळी पर्यंत चौकशी करून त्या पद्धतीने विविध पथके रवाना केली आहेत,

    घडलेल्या प्रकारानंतर भुईंज पोलिस ठाण्याला जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोषी ,अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम,यांनी भेट देऊन तपासासाठी सूचना व मार्गदर्शन केले,स्थानिक गुन्हे शाखा सातारा,भुईंज पोलिस गुन्हे गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत महामार्गावर तपास करीत होते,

     घडलेल्या दरोड्याच्या प्रकाराने सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे,दरम्यान यातील नेमका व्यापारी कोण व किती रक्कम होती तसेच पकडलेल्या संशयित इसमाने काय सांगितले याबाबत माध्यमापासून गोपनीयता पाळण्यात अली आहे,

    रात्री उशिरापर्यंत हा गुन्हा भुईंज पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे पी.एस.आय. पतंग पाटील, पी. एस. आय. सूरज शिंदे करीत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Post Views: 89 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक

Live Cricket