अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » लोकहित सर्वोच्च! खचलेला तापोळा–महाबळेश्वर मार्ग अखेर सुरू;१०५ गावांना मोठा दिलासा

लोकहित सर्वोच्च! खचलेला तापोळा–महाबळेश्वर मार्ग अखेर सुरू;१०५ गावांना मोठा दिलासा

लोकहित सर्वोच्च! खचलेला तापोळा–महाबळेश्वर मार्ग अखेर सुरू;१०५ गावांना मोठा दिलासा

​जनप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून संकटावर मात; स्वखर्चातून मदत अन्‌ भूधारकाची औदार्यपूर्ण भूमिका ठरली प्रेरणादायी

​महाबळेश्वर प्रतिनिधी –अतिवृष्टीमुळे खचलेल्या आणि १०५ गावांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या तापोळा–महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील संकटावर अखेर यशोगाथा रचत मात करण्यात आली आहे. अहोरात्र चाललेल्या दुरुस्तीच्या कामानंतर हा मार्ग आता छोट्या चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. ही केवळ एका रस्त्याची दुरुस्ती नसून, लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी संविधानातील लोककल्याणकारी मूल्यांचे जतन करत उभारलेला एक अद्वितीय आदर्श ठरला आहे.

शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चातून मद्दत 

​आपत्तीच्या काळात कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा संपर्क आणि प्राण वाचवणे महत्त्वाचे मानून लोकप्रतिनिधींनी तत्परता दाखवली. जिल्हा परिषद सदस्य श्री. अजितदादा सकपाळ आणि महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती श्री. संजयभाई मोरे यांनी शासकीय निधीची वाट न पाहता, स्वतःच्या खिशातून तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून दिली व रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात केली.

​तसेच महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. आबा शिंदे यांनी आवश्यक त्या अवजड यंत्रसामग्रीचे प्रभावी नियोजन केले. स्वतः सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रत्यक्ष घटनास्थळी थांबून त्यांनी कामाचा पाठपुरावा केला, ज्यामुळे दुरुस्तीच्या कामाला मोठा वेग मिळाला.

​प्रशासन, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचे अहोरात्र परिश्रम रस्ता लवकरात लवकर मोकळा व्हावा यासाठी सर्वच स्तरांतून अभूतपूर्व समन्वय पाहायला मिळाला. या कार्यात:सातारा जिल्हा युवा सेना अध्यक्ष: विशालभाऊ सकपाळ,संविधान प्रचारक: उत्तम भालेराव,सामाजिक कार्यकर्ते: भाऊसाहेब मोरे, संपत जाधव, गणेश सपकाळ, राम सपकाळ, राजू सपकाळ, आनंददादा (खांबील),​समिती: १०५ गाव नियोजन समितीचे सर्व कार्यकर्ते या सर्वांसह तहसील प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), नगरपरिषद, वन विभाग आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने रात्रंदिवस एक करून नागरिकांचा संपर्क पूर्ववत करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले.

खाजगी मालमत्ताधारकाचे कौतुकास्पद औदार्य

​या संपूर्ण मोहिमेत सर्वात प्रेरणादायी ठरली ती रस्त्यालगतच्या संबंधित प्रॉपर्टी मालकाची भूमिका. स्वतःच्या लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान होत असतानाही, जनहिताचा विचार करून त्यांनी कामात कोणताही अडथळा आणला नाही आणि रस्त्यासाठी आपली जागा मोकळी करून दिली. वैयक्तिक स्वार्थापेक्षा ‘सार्वजनिक हित’ मोठे मानण्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राजकारण नव्हे, तर ‘लोककारण’ महत्त्वाचे!

​आपत्तीच्या काळात राजकीय मतभेद बाजूला ठेवून जेव्हा शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकत्र येतात, तेव्हा सर्वात कठीण आव्हानांवरही मात करता येते, हे या घटनेने सिद्ध केले आहे. पारदर्शकता आणि सामूहिक जबाबदारीच्या या भावनेमुळेच १०५ गावांतील हजारो ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

​१०५ गावांतील सर्व नागरिकांच्या वतीने या मोहिमेत रात्रंदिवस राबणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि औदार्य दाखवणारे मालमत्ताधारक यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत. लोकसेवेचा हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket