अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

सातारा दि. 2 :- नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतक-याचे स्थैर्य अबाधित राखणेसाठी शासनाने खरीप हंगाम २०२६ साठी पंतप्रधान फसल बीमा योजना पुढे सुरु ठेवणेस मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेत सहभागी होणेचे आवाहन कृषि विभागामार्फत करणेत येत आहे. तथापि सदर योजनेत शेतक-यांनी सहभागी होणेची अंतिम मुदत दि. ३१ जूलै २०२६ अशी होती. तथापि, राज्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी सहभाग, शेतक-यांकडे अॅग्रीस्टेंक अंतर्गत फार्मर आयडी नसणे, PMFEIY Portal मधील व्यत्यय, आधार व CSC सर्व्हरवरील व्यत्यय, राज्याच्या भूमि अभिलेख पोर्टलच्या तांत्रिक ससेवेतील व्यत्यय इ. मुळे शेतक-यांचा योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने योजनेत सहभागी होणेसाठी शेतक-यांना विशेष बाब म्हणून १० ऑगस्ट २०२६ अखेर मुदतवाढीस मान्यता दिली आहे.

जिल्ह्यातील भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन व ख. कांदा या १० पीकांसाठी अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना राबविणेत येत असून सद्यस्थितीतील अल-निनोच्या पार्श्वभूमिवर अनिश्क्षित हवामानामुळे पीकांच्या वाढीवर व पर्यायने उत्पन्नावर परिणाम होणार असल्याने शेतक-यांना पीक विमा योजनेची अत्यंत आवश्यकता आहे. असे असूनही आजअखेरचा अहवाल पाहता योजनेत शेतक-यांचा सहभाग कमी असल्याचे दिसून येत आहे. अतिशय अल्प दरामध्ये ही योजना शासनाने सुरु केली असून ती शेतक-यांच्या हिताची असल्याने शेतक-यानी वाढीव मुदतवाढीच्या कालावधीत तात्काळ आपला विमा हप्ता भरुन योजनेत सहभागी होणेचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket