राजेंद्र विद्यालय खंडाळा येथील 1976-77 च्या माजी विदयार्थ्यांनी काव्य संग्रह “दोन शब्द दोन गोष्टी “”पुस्तक प्रकाशनाने केला स्नेह मेळावा संपन्न.
सातारा- राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे 1976-77 या वर्षातील दहावीची बॅच विद्यार्थी,सुमारे पन्नास वर्ष कालावधी नंतर गुरुजन आणि विद्यालयाच्या शैक्षणिक ऋणातून मुक्त होण्यासाठी व शुभाआशीर्वाद घेण्यासाठी एकत्र आले, या प्रसंगी उपस्थितांपैकी अनेकांनी आपआपली मनोगत व्यक्त करताना शिक्षक वर्ग, संस्थाप्रमुख खंडाळा भाग शिक्षण समितीचे राजेंद्र विद्यालय खंडाळा विद्यमान अध्यक्ष श्री शंकरराव गाढवे सर,संचालक श्री पवार सर, श्री पंडित सर,श्री इंद्रजीत शिंदे सर व शिरवळ येथील ज्ञान संवर्धिनी संस्था अध्यक्ष व पूर्वाश्रमीचे शिक्षक श्री रा का देशपांडे सर, सर्वांचे अनुभवी मार्गदर्शन शिक्षणाबद्दल आभार मानले .
या वेळी विद्यालयातील माजी विद्यार्थी श्रीकांत देशमुख यांनी शालेय ऋणातून मुक्त होण्यासाठी स्वलिखित काव्यसंग्रह दोन शब्द दोन गोष्टी या पुस्तकाची चौथी आवृत्ती संस्थापक अध्यक्ष खंडाळा भाग शिक्षण समिती राजेंद्र विद्यालय खंडाळा आदरणीय श्री शंकरराव गाढवे सर यांच्या हस्ते व वरील मान्यवर यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशीत केले.
मान्यवरांनी पुस्तक लिखाण व प्रकाशनाकरिता श्रीकांत देशमुख यांचे अभिनंदन केले. यावेळी श्री शंकरराव गाढवे सर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे कर्तुत्व आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रगती सुधारणा याबाबतीत विशेष कौतुक केले. प्रामाणिक प्रयत्न व त्यातील सातत्य राखल्याने सर्वांचे आयुष्यमान राहणीमान सुधारले आहे ही संस्थेच्या दृष्टीने खूप भूषणावह बाब आहे व याबद्दल सर्व विद्यार्थी यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन श्री सुदाम धापते, श्री रमेश जाधव श्री संपत पवार यांनी करून वर्ग मित्र मैत्रिणी भेटीचा योग घडवला त्याबद्दल संस्थेच्या वतीने उपस्थित तत्कालीन शिक्षक वर्ग यांनी आभार मानले.
या वेळी प्राचार्य श्री नालबंद सर, सांस्कृतिक विभागाचे सावंत सर यांचे सर्व उपस्थित विद्यार्थी वर्ग यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विविध ठिकाणाहून हे माजी विद्यार्थी एकत्र आले होते आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याने एक वेगळी आठवण सर्वांना शुभेच्छा देणारी ठरली.
