Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » फुले दाम्पत्याचे कार्य देशाला प्रेरणा देणारे -प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे

फुले दाम्पत्याचे कार्य देशाला प्रेरणा देणारे -प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे

फुले दाम्पत्याचे कार्य देशाला प्रेरणा देणारे –प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे 

सावित्रीबाई फुले स्मृतीदिनी कार्यविचार चिंतन

सातारा : सर्व मुलांच्या शिक्षणासाठी ,आणि सर्वांच्या कल्याणासाठी अतिशय तळमळीने जनजागृतीचे,न्यायाचे कार्य सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांनी केले. सत्याचा शोध घेऊन समाजमनाला डोळस केले. यशवंतसारख्या मुलाला दत्तक घेऊन त्याला देखील लोकहिताची दृष्टी दिली. जोतीराव मृत्यू पावल्यानंतर अंत्यविधी करत असताना दत्तक पुत्र यशवंत यांला जेंव्हा काहींनी विरोध केला तेंव्हा सावित्रीबाई यांनी स्वतः यशवंतला सोबत घेऊन अंत्यविधी करवून घेतले. हे त्या काळातील खूप क्रांतिकारी कार्य होते. स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी आज सुद्धा आपण सजग नसतो,पण जेंव्हा शिक्षणच मिळत नव्हते,जातीभेद होता, प्रतिकूल परिस्थिती होती अशा काळात स्वतःला मूल नसताना देखील दुसऱ्यांच्या मुला-मुलींसाठी आस्था आणि तळमळीने जोतीराव व सावित्रीबाई यांनी शिक्षण दिले. सर्व प्रकारची गुलामगिरी दूर करण्यासाठी, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी, अखिल समाजात समता आणि बंधुत्व निर्माण करण्यासाठीचे फुले दाम्पत्याचे कार्य देशाला प्रेरणा देणारे आहे,असे विचार रयत शिक्षण संस्थेच्या ऑडीट विभागाचे सहसचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ते बोलत होते. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखा विभागाचे अधिष्ठाता,डॉ.आर.आर.साळुंखे विद्यापीठ भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख,ज्युनियर विभाग उपप्राचार्य डॉ.गणेश पाटील,स्टाफ वेल्फेअर विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी पाटील,प्रा.संदीप भुजबळ , अधीक्षक तानाजी सपकाळ व प्राध्यापक ,शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. 

    सावित्रीबाई यांचे धैर्य,करुणा आणि नेतृत्व याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले ‘ ज्योतीराव यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व त्यांनी केले. त्या विचाराशी ठाम होत्या, १८९७ ला पुण्यात प्लेगची साथ आली .या काळात यशवंत याने वैद्यकीय शिक्षण घेतले असल्याने प्लेग झालेल्या अनेकांना उपचारासाठी त्यांनी यशवंतकडे नेले. हे सेवा कार्य करत असताना या माऊलीला प्लेग झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. सारे आयुष्य त्यांनी गरिबांच्या न्यायासाठी,हक्कासाठी,समाजाला शिक्षण देण्यासाठी समर्पित केले. सावित्रीबाई यांच्या कार्याचा वारसा,आपण जपला पाहिजे असे ते म्हणाले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket