सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी वापरताय कागद? कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम

खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी वापरताय कागद? कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण  रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम

खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी वापरताय कागद? कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण  रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम

सातारा : शाळेतील तसेच ऑफ़िसच्या डब्यातील पदार्थ , चपात्या, रस्त्यावरील खाद्य पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्र, प्लास्टिक, ॲल्युमिनीयम, फॅाईलमध्ये गुंडाळले जातात. त्याचा खाद्यपदार्थांवर काय परिणाम होतो याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे वृत्तपत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये अतिशय घातक असे केमिकल असतात. जे बायोएक्टिव्ह असल्याने आपल्या शरीरात गेल्यामुळे त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खास करुन पोटाशी संबंधित विकाराचा धोका निर्माण होतो. 

प्रिंटिंगच्या शाईमध्ये शिसे आणि जड धातूंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशा वेळी कागदात अन्न बांधून ठेवल्यास ते रसायन अन्नाच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. FSSAI भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कागदावर जीवाणू, विषाणू देखील मोठ्या प्रमाणात असतात. हे जीवाणू, विषाणू अन्नात जाऊन त्या आहाराचा तुमच्या आरोग्यावर गंभीर आजार होऊ शकतो. 

अनेकदा डब्यात दिली जाणारी चपाती, सॅंडविच, तसेच रस्त्यावरील पदार्थ पॅक करण्यासाठी प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यातूनही घात रसायनं अन्नामध्ये उरतात, त्यामुळे यातील आरोग्याला हानी पोहोचू शकते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स यामध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, अ‍ॅल्युमिनियम फॉइलमधून वेगवेगळ्या उत्तेजकांमध्ये, विशेषतः डिस्टिल्ड वॉटरमध्ये तसेच अम्लीय आणि अल्कधर्मी द्रावणात बाहेर पडतात. अन्नात बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढताे म्हणून त्यातील पदार्थ खाणे टाळले पाहिजे. 

वर्तमान पत्रात बांधलेले खाद्यपदार्थ खाणे अनेक प्रकारे जीवघेणं ठरू शकतं. कारण वर्तमानपत्रातील शाईमध्ये मल्टिपल बायोअॅक्टिव मटेरिअल असते. ज्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. ही शाई शरीरात गेल्यावर कॅन्सरसह इतरही जीवघेणे आजार बळावू शकतात अशी माहिती फुड अथॉरिटीने दिली आहे.

आपण आपल्या दैनंदिन दिनचर्यात बहुतांश वेळा पॅकेज केलेले अन्नाचा वापर करतो आणि त्यामुळे सुरक्षित, ताजे व गरम अन्नाचे सेवन करता येते म्हणून ते चांगले असा भ्रम आपल्या मनात असतो. परंतु ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण बहुतांश खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये प्लास्टिकचे घटक आणि घातक रसायने वापरलेली असतात, जे अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि कर्करोगासारख्या इतर अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतात.

वर्तमानपत्रे हे अन्न पदार्थ पॅकेजिंग म्हणून वापरण्यासाठी तयार केलेली नाहीत. त्यांचे उत्पादन आणि हाताळणी फूड-ग्रेड पॅकेजिंग मटेरियल्समाणेच स्वच्छता आणि सुरक्षा मानकांचे पालन करत नाहीत. त्यामुळे, त्यांचा वापर करणं म्हणजे आरोग्याला धोका निर्माण करणं होय.

डॉ. चैत्रा देशपांडे (रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा) सांगतात की, आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी वृत्तपत्रांमध्ये खाद्यपदार्थ बांधून विशेषतः रस्त्यावर विकले जाणारे पदार्थ असे पॅक केले जातात. यामध्ये तळलेले पदार्थांचे प्रमाण अधिक असून पदार्थांमधील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी वृत्तपत्राचा वापर करतात. बऱ्याच ठिकाणी स्वयंपाकघरातही तळण्याचे पदार्थ वर्तमानपत्रावर काढले जातात. यामुळे त्यातील पदार्थ विविध रसायनांच्या संपर्कात येऊन आपल्या अन्नात मिसळतात. तसेच प्रिंटींगसाठी वापरलेले रंग खाण्यायोग्य देखील नसतात. जेव्हा हा पेपर गरम अन्न किंवा तेलाच्या संपर्कात येतो तेव्हा ते हानिकारक रसायने आणि रंग शोषून घेतात आणि विविध आरोग्य समस्या उद्भवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत करतात.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket