Post Views: 165
पांडवकालीन स्वयंभू भुतेश्वर मंदिरात वार्षिक सप्ताह — धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी
केळघर-पांडवकालीन स्वयंभू भुतेश्वर मंदिर, भुतेघर येथे रविवारी (ता. २ नोव्हेंबर) वार्षिक सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य विकास मानकुमरे यांनी दिली.
रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सप्ताहानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या उत्सवात उपस्थित राहून धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नेहरू युवा मंडळ भुतेघर मुरा (पाभळ) व प्रासादिक भजनी मंडळ भुतेघर मुरा यांनी केले आहे.




