“सकारात्मक दृष्टीकोनातून विवेकी विचारांनी जीवनाची वाटचाल केली पाहिजे.” सहा.प्रा. सुर्यकांत अदाटे
मौलाना आझाद यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान व स्वातंत्र्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून केलीली कामगिरी अतुलनीय आहे. त्यांनी भारताच्या व भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या आमुलाग्र बदलासाठी दिलेले योगदान लक्षांत घेऊनच त्यांचा जयंती दिन राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या कार्याचे अखंड स्मरण ठेवून बदलत्या काळाची आव्हाने पेलण्यासाठी भारतीय शिक्षण व्यवस्था सजग व समर्थ ठेवली पाहिजे. असे प्रतिपादन सहा.प्रा. सुर्यकांत अदाटे यानी प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर मध्ये सांस्कृतिक विभाग व समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मौलाना आझाद जयंती व राष्ट्रीय शिक्षण दिन २०२४” या कार्यक्रमात केले.
पुढे ते म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हे पदवी अभ्यासक्रमामध्ये अपेक्षित आहे. आपण जसा विचार करतो तसेच आपण घडतो म्हणून आपण सकारात्मक दृष्टीकोनातून विवेकी विचारांनी जीवनाची वाटचाल केली पाहिजे.
याप्रसंगी आपल्या महाविद्यालयामध्ये विविध कौशल्याधारित (skill Enhancement) कोर्सेस सुरु आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व त्याचा प्रत्यक्ष जीवनात वापर करून उज्ज्वल यश संपादन करावे. असे अवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी चवरे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन, आभार डॉ.अशोक शेलार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सहायक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संखेने उपस्थित होते.