अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » २४ मार्च : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गौरीशंकरचे प्राध्यापक ठरले क्षयरोग (टी बी) वरील पेटंटचे मानकरी.

२४ मार्च : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गौरीशंकरचे प्राध्यापक ठरले क्षयरोग (टी बी) वरील पेटंटचे मानकरी.

२४ मार्च : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गौरीशंकरचे प्राध्यापक ठरले क्षयरोग (टी बी) वरील पेटंटचे मानकरी.

इंडियन पेटंट ऑफिस नवी दिल्ली यांनी नवसंशोधनाची घेतली दखल.

लिंब-मल्टी ड्रग रेजिस्टन्स क्षयरोग (टी बी) या दुर्धर आजारावर परिणामकारक व प्रभावी नवसंशोधन गौरशंकरच्या प्राध्यापकांनी केले आहे. या नवसंशोधनास इंडियन पेटंट ऑफिस, नवी दिल्ली यांनी विशेष दखल घेऊन कन्सेप्ट पेटंट म्हणून मान्यता दिली आहे. या नवसंशोधनासाठी डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. नूतन गवांदे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. क्षयरोग (टी बी) या आजाराने देशात मृत्युमुखी पडणाऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोना या आजारापेक्षाही भयंकर असणारा हा आजार. यावर मात करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध तज्ञांकडून नव संशोधन केले जात आहे. गौरीशंकरच्या प्राध्यापकांनी केलेले नव संशोधन हे क्षयरोग (टी बी) साठी प्रभावी व परिणामकारक ठरणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. यामुळे क्षयरोग (टी बी) आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना एक दिलासा मिळाला आहे. मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या क्षयरोग (टी बी) या आजाराविषयी समाजात विविध मतप्रवाह आहेत. गौरीशंकरच्या प्राध्यापकांनी केलेल्या नवसंशोधनामुळे व प्राप्त पेटेटमुळे आता या आजारावर मात करता येणे शक्य होणार आहे. या नवसंशोधनासाठी गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब. महाविद्यालयातील एम. फार्मसी मधील विद्यार्थिनी कोमल इचके, आसिया तांबोळी, रोहित माळवे यांनीहि या नवसंशोधनामध्ये सहभाग घेतला. पेटंटप्राप्त प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष्य मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक अनिरुद्ध जगताप, प्रशाकीय अधिकारी नितीन मुदलगीकर व जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन केले. 

क्षयरोग (टी बी) या दुर्धर आजारावर नवसंशोधन करणारे गौरीशंकरच्या प्राध्यापकांनी वैद्यकीय सेवा क्षेत्रात नवी क्रांती घडवली आहे त्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो त्यांना या क्षेत्रात मिळालेल्या पेटंट मुळे गौरीशंकरच्या शैक्षणिक क्षितिजावर एक मानाचा तुरा रोवला आहे असे मत गौरीशंकरचे अध्यक्ष मदनराव जगताप यांनी व्यक्त केले आहे.

…श्रीरंग काटेकर जनसंपर्क अधिकारी, गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket