Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » 76 वा अमृत महोत्सव व प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानिमित्त शहीद वीर माता पिता व पत्नी यांचा सत्कार व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

76 वा अमृत महोत्सव व प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानिमित्त शहीद वीर माता पिता व पत्नी यांचा सत्कार व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

76 वा अमृत महोत्सव व प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानिमित्त शहीद वीर माता पिता व पत्नी यांचा सत्कार व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र शासन -कामगार विभाग, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ,कामगार कल्याण केंद्र सातारा यांच्या वतीने 76 वा अमृत महोत्सव व प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानिमित्त शहीद वीर माता पिता व पत्नी यांचा सत्कार व सन्मान सोहळा दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी १०.०० वाजता सातारा डायग्नोस्टिक सेंटर हॉस्पिटल सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आला.

प्रमुख पाहुणे डॉक्टर सौ .जयश्री शिंदे डायरेक्टर सातारा हॉस्पिटल सातारा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विक्रम शिंदे सी ए ओ सातारा डायग्नोस्टिक सेंटर हॉस्पिटल सातारा, कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.श्री संभाजी पवार कामगार कल्याण अधिकारी सांगली,श्री श्रीकांत देशमुख पब्लिक रिलेशन मॅनेजर, रिटायर्ड जे सी ओ श्री बाळासाहेब गवळी , श्री सुनील कदम , श्री विवेक कदम आप्पा , श्री ऋतुराज शिंदे, श्री अजय चव्हाण, श्री अजिंक्य मोरे,तसेच खालील प्रमाणे शहीद वीरजवान यांच्या कुटुंबियांचा शाल ,श्रीफळ, संविधान पुस्तक, मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले १) शहीद वसंत सयाजी घाडगे,वीर पत्नी संगीता वसंत घाडगे २) शहीदअंकुश परशुराम घोरपडे, वीरआई सुमन परशुराम घाडगे ३) शहीद प्रकाश विठोबा शिंदे, वीर पत्नी वनिता प्रकाश शिंदे ४) शहीद दीपक प्रकाश निकम वीराआई अंजना प्रकाश निकम५) शहीद मुनीर युसुफ खान, वीर पत्नी इंताज मुनीर खान या कुटुंबीयांचा सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री श्रीकांत देशमुख यांनी केले ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री संदीप कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता मंडळाचे कर्मचारी श्री सोमनाथ चोरगे, सौ सुजाता जाधव, सौ तृप्ती निकम, सौ ज्योती मोरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket