Home » ठळक बातम्या » ३ लाखांची रोकड परत केल्या बद्दल नितीन डेरेनवर कौतुकांचा वर्षाव

३ लाखांची रोकड परत केल्या बद्दल नितीन डेरेनवर कौतुकांचा वर्षाव

३ लाखांची रोकड परत केल्या बद्दल नितीन डेरेनवर कौतुकांचा वर्षाव

वाई प्रतिनिधी: वेळे ता.वाई येथील रहिवासी असलेले नितीन शेठ डेरे यांच्या वेळे येथील हॉटेल विशाल या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता आंबा व्यापारी दिनेश देसाई हे पुण्यावरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल विशाल येथे नाश्त्यासाठी थांबले होते व नाश्ता झाल्या नंतर त्यांच्या जवळ रोख रक्कम 3 लाख रुपये असलेली बॅग ते हॉटेल मध्येच विसरून गेले कराड येथे पोहोचल्या वर आपल्या सोबत असणारी पैशाची बॅग हॉटेल मध्येच विसरल्याचे त्यांच्या हि गोष्ट लक्षात आली. हि बॅग कस्टमर विसरुन गेले आहे हे हॉटेल मालक नितीनशेठ डेरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ती उघडुन न पाहता ताब्यात घेवुन स्वताच्या लॉकर मध्येच सुरक्षित ठेवली होती .

पण काही तासातच हे आंबा व्यापारी कराडहुन परत वेळे येथील विशाल हॉटेल मध्ये आले.

आंबा व्यापारी देसाई आल्या नंतर त्यांची शहानिशा करून नितीन डेरे यांनी रोख रक्कम 3 लाख रुपये असलेली बॅग त्यांना परत केली

हॉटेल मालक नितीन डेरे यांचा हा प्रामाणिक पणा पाहुन आंबा व्यापारी देसाई यांनी त्यांचे कौतुक करुन मनःपूर्वक आभार मानले आणि आजच्या युगात असेही प्रामाणिक लोक आहेत याबद्दल त्यांनी आभार मानले व त्यांना रोख रक्कम बक्षीस देऊ करत होते परंतु नितीन शेठ यांनी त्यांना विनंती पूर्वक नकार दिला नितीन डेरे यांच्या या प्रामाणिक पणाचे वेळे गावासह सर्व स्तरातून कौतुकांचा आणी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket