Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उपेक्षित समाजाचे राजेर्षी शाहु महाराजानी जीवनमान फुलविले :- श्रीरंग काटेकर

उपेक्षित समाजाचे राजेर्षी शाहु महाराजानी जीवनमान फुलविले :- श्रीरंग काटेकर

उपेक्षित समाजाचे राजेर्षी शाहु महाराजानी जीवनमान फुलविले :- श्रीरंग काटेकर

गौरीशंकरच्या डॉ. पी व्ही सुखात्मे स्कूलमध्ये राजेर्षी शाहूमहाराज यांची जयंती उत्साहात साजरी

लिंब :- सामजिक समतेचे व्रत स्विकारून उपैक्षित समाजघटकासाठी कल्याणकारी योजना राबवून त्याचे जीवनमान खऱ्या अर्थाने फुलविणारे राजर्षी शाहू‌महाराज या घटकासा‌ठी देवदूतच होते असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब ता जि सातारा येथील गौरीशंकरचे डॉ. पी. व्ही सुखात्मे इंग्लिश मीडियम(सी बी एस ई) स्कूल मध्ये राजेर्षी शाहुमहाराज यांच्या जयंती निमित आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी स्कूलचे प्रभारी प्राचार्य, धनशाम चव्हाण व सर्व शिक्षक उपस्थित होते .

श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले कि राजर्षी शाहुमहाराज हे दिनदुबळ्या समाज घटकाच्या व्यथा व वेदना जाणणारे एक संवेदनशील लोकराजा म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हद‌यात त्यानी स्थान मिळविले होते

प्रांरभी राजर्षी शाहुमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्मितल सावंत, हार्षदा तावरे, खिजर पटेल या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहुमहाराज यांच्या कार्यकर्तूृत्वाचा आढावा घेतला.

प्रास्तविक व आभार विधी शिंगटे हिने केले

 -राजेर्षी शाहु महाराजानी मानवतेची भूमिका घेवून सर्वधर्मियाना सामावून घेतले. पुरोगामी विचाराचा वारसा पुढे घेवून जाताना समाजातील अनिष्ट रुढी पंरपराला मूठमाती दिली. जात धर्म पैक्षा मानवता श्रेष्ठ हा दुष्टीकोन ठेवून राजेर्षी शाहु महाराजानी राज्यकारभार केला. राजवैभव हे उपभोगण्याचे साधून नसून ते दिनदुबळ्या गोरगरीब अज्ञानी. जनतेच्या उद्धारासाठी आहे याची जाणीव ठेवणार एक संवेदनशील मनाचा लोकराजा होता.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

संत रोहिदास समाज फाऊंडेशनतर्फे ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा महाबळेश्वरमध्ये भव्य गौरव सोहळा संपन्न

Post Views: 14 संत रोहिदास समाज फाऊंडेशनतर्फे ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा महाबळेश्वरमध्ये भव्य गौरव सोहळा संपन्न महाबळेश्वर-सातारा आणि रायगड जिल्ह्यातील संत

Live Cricket