Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » नगरपालिका आणि प्रशासनाच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदार जनजागृती मोहीम

नगरपालिका आणि प्रशासनाच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदार जनजागृती मोहीम

नगरपालिका आणि प्रशासनाच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदार जनजागृती मोहीम

महाबळेश्वर दि.]: राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज  गिरिस्थान प्रशालेत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक मतदानाची जागरूकता फेरी काढण्यात आली.

 या फेरीमध्ये नगरपालिका मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील, वरिष्ठ लिपिक श्री. आबाजी ढोबळे, श्री. धड साहेब तसेच सर्व वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्रीयुत पळसे साहेब, लिपिक दत्ता वाघदरे, तहसीलदार सौ. तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार सौ. शेख मॅडम, श्री. सावंत साहेब, श्री. चव्हाण साहेब आणि इतर सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते.

गिरिस्थान प्रशालेचे प्राचार्य श्री. माने सर, कला वाणिज्य महाविद्यालय प्राचार्य श्री. कदम सर, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या कार्यक्रमाला उत्साही प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले.

या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट नव्या पिढीला मतदानाचे महत्व पटवून देणे आणि त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करणे हे होते. विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीत त्याची भूमिका याबाबत माहिती देउन विद्यार्थ्यांना मतदार जागृतीची शपथ ही देण्यात आली. 

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदानाची जागरूकता वाढेल आणि ते भविष्यात सक्रिय मतदार बनतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 249 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket