नागठाणे येथे टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत खेडच्या बाप लेकीचा मृत्यू
सातारा – रविवार दिनांक आठ मे रोजी संध्याकाळी साडे चार च्या दरम्यान नागठाणे येथे हा भीषण अपघात झाला. नागठाणे गावच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून इब्राहिम हसन शेख वय 38, मेहेक इब्राहिम शेख अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. दोघेही पुणे येथील खेड तालुक्यातील रहिवाशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागठाणे गावच्या हद्दीतील कराडकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या NH4 या महामार्गावर दुपारी 4.30 च्या सुमारास भीषण अपघात झाला असून यामध्ये बाप लेकीचा मृत्यू झाला आहे. NH 48 च्या लेन वर टाटा टेम्पो (क्र MH 12 GT 9089) चालकाच्या रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून निव्वळ निष्काळजी पणामुळे समोर आलेल्या मोटार सायकल ला धडक दिल्याने हा अपघात झाला. आसिफ नैमुद्दीन सय्यद वय 30 वर्षे असे टेम्पो चालकाचे नाव असून तो हडपसर पुणे येथील रहिवासी आहे. टेम्पो चालकावर बोरगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई सुरु आहे.
