Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

 खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व कराडवासीय यांच्या बैठकीनंतर निघाला तोडगा येत्या आठ दिवसात लागणार पाईपलाईनचे काम मार्गी 

कोयना नदीच्या पाण्यामुळे कराड व मलकापूर तसेच सैदापूर या उपनगरांना पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन वाहून गेली आहे .या समस्येचा खासदार उदयनराजे भोसले यांनी तात्काळ आढावा घेऊन शनिवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत बैठक लावली आपत्कालीन परिस्थितीमध्ये 120 हॉर्स पावर ची विद्युत मोटार बसवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत व वाहून गेलेल्या पाईपलाईनचे दुरुस्ती काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे .

 लोकसभेच्या निवडणुका नंतर नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने खासदार उदयनराजे भोसले सक्रिय झाले आहेत . गेल्या आठ दिवसापासून कराड कोयना पाटण या भागात पावसाचा जोर वाढल्याने कोयना नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे .यामध्ये कोयना नदीतून उपसा केंद्राच्या कराड शहर मलकापूर व सैदापूर या भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या वाहून गेल्या त्यामुळे तेथे आणीबाणीची परिस्थिती उद्भवली होती . खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या समवेत या समस्येची पाहणी केली तसेच कराड नगरपालिकेला पर्यायी विद्युत मोटारी उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना केल्या 

खासदार छ उदयनराजे यांनी साताऱ्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना बैठक लावायला सांगून हा प्रश्न तातडीने कसा मार्गी लागेल याबाबत सूचना केली . 

या बैठकीला राजेंद्रसिंह यादव सुनील काटकर, हनमंतराव पवार,  संग्राम बर्गे एमजीपीचे अधिकारी डीपी जैन कंपनी मुख्याधिकारी कराड नगरपालिकेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते . उदयनराजे यांनी या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली .यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी डुडी म्हणाले ज्या ठिकाणी पाईपलाईन वाहून गेले आहेत तेथे जलवाहिन्यांना मजबूत आधार देऊन त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र कराड मलकापूर आणि सैदापूर या भागांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी १२० हॉर्स पावर आणि 70 हॉर्स पावर चे दोन उपसा पंप बसवण्यात आले असून पहिल्या टप्प्यात कराडचा 80 टक्के पाणी प्रश्न सोडवण्यात आला आहे पुढील टप्प्यामध्ये मलकापूर आणि सैदापूर यांचाही पाणी प्रश्न तातडीने सोडवले जाईल या तिन्ही भागांसाठी सुधारित पाणीपुरवठा योजना लागू करण्यात येईल तसेच एक स्वतंत्र जलवाहिनी सुरक्षित पातळीवर ठेवून त्याचे तातडीने बांधकाम पूर्ण करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket