उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सन्मान
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणीची बैठक मुंबई दादर येथील वसंत स्मृती या भाजपाच्या मुंबई कार्यालयात पार पडली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला पक्षातील सर्व खासदार, विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करून अभिनंदन करण्यात आले.
बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रिय मंत्री पियुष गोयल, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, गिरीशभाऊ महाजन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते.